मंद्रुळकोळे सेवा सोसायटीत श्री.ज्योतिर्लिंग शेतकरी सन्मान पँनेलचा दणदणीत विजय.विरोधकांचा धुव्वा उडवून सत्ता कायम राखण्यात हिंदुराव पाटील गट यशस्वी.

निवडणुकीचा निकाल जाहीर होताच  कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला

ढेबेवाडी|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

   संपूर्ण  पाटण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या मंद्रुळकोळे(ता.पाटण)वि.का.स.सेवा सोसायटीच्या  पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व जिल्हा नियोजन समिती सदस्य हिंदुराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री.ज्योतिर्लिंग शेतकरी सन्मान पँनेलने सर्वच्या सर्व 13 जागा मोठ्या फरकाने जिंकून सेवा सोसायटीवरील आपली सत्ता कायम ठेवित विरोधकांचा धुव्वा उडविला.

          या सोसायटी निवडणुकीत हिंदुराव पाटील यांच्या विरोधात  ज्योतिर्लिंग शेतकरी बचाव  पँनेल  उतरले होते मात्र या निवडणुकीत त्यांचा  मोठा पराभव झाला या निवडणुकीत हिंदुराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमधून जोतिराम काटकर, सुभाष पाटील,दादासो साळुंखे,संजय पाटील, शिवाजी शिंदे,बापू मोरे,नथुराम ढेब,संजय पाटील, कमल काळुगडे,निलम पवार,धोंडीराम कांबळे, सदाशिव मदने,पांडुरंग पुजारी असे 13 संचालक   विजयी झाले.                                              

Popular posts
गुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .
इमेज
काळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र
इमेज
बनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,
इमेज
काळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..
इमेज