जन विकास सहकारी पतसंस्था सर्वसामान्य, गरजू व व्यवसायिकांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभी राहील : बाळकृष्ण काजारी

तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
तळमावले तालुका पाटण येथील जन विकास सहकारी पतसंस्था सर्वसामान्य गरजू व्यावसायिकांच्या पाठीशी नेहमीच खंबीर पणे उभी राहिली आहे अल्पावधीतच जनसामान्यात विश्वासार्हता प्राप्त केली आहे हे केवळ सभासदांच्या विश्वासामुळेच करता आले. जनसामान्यांच्या विश्वासामुळेच ही आर्थिक संस्था सहकारात खंबीरपणे उभी आहे. असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन बाळकृष्ण काजारी यांनी व्यक्त केले.

तळमावले तालुका पाटण येथील जन विकास ग्रां. बि.शेती सहकारी पतसंस्थेचा 7 वां वर्धापनदिन उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.त्यानिमित्त संस्थेने सत्यनारायण पूजा आयोजित केली होती.

सदर कार्यक्रमा करिता संस्थेचे सभासद, हितचिंतक संचालक, सल्लागार मंडळ, कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन करताना संस्थेचे चेअरमन बाळकृष्‍ण काजारी पुढे म्हणाले नुकत्याच पार पडलेल्या सन 2021-22 या आर्थिक वर्षात संस्थेस 425000 चा निव्वळ नफा प्राप्त झालेला असून वर्धापन दिनानिमित्त संस्थेने सभासद करिता 5 टक्के लाभांश जाहीर केलेला आहे.लवकरच सभासदांच्या सेव्हिंग खात्यात लाभांश जमा केला जाईल याची सर्व सभासदांनी नोंद घ्यावी व खात्यास काही अपूर्णता असेल तर सभासदांनी त्वरित संस्थेत येऊन पूर्ण करावी. आपल्या सर्व सभासद ठेवीदार हितचिंतक यांच्या विश्वासावरच संस्थेची वाटचाल गतिमान होत आहे. त्यामुळेच संस्थेने मागील आर्थिक वर्षात एकत्रित व्यवसाय 7,25 कोटी व 10 कोटी ठेवींची यशस्वी वाटचाल केली आहे. सभासदांनी, ठेवीदारांनी, व्यवसायिकांनी संस्थेच्या नवनवीन ठेव योजना, कर्ज योजना याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे चेअरमन श्री. बाळकृष्ण काजारी यांनी यावेळी केले.