सारंग पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनसहकार पतसंस्थेच्या वतीने जिजाऊ वस्तीगृहातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

 


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आयटी सेलचे प्रदेश प्रमुख व सनबिम उद्योग समूहाचे चेअरमन सारंग पाटील बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. 

सारंग पाटील यांच्या ५० व्या वाढदिवसाचे औचित्य साधत पाटण ताुक्यातील तळमावले येथील जनसहकार निधी लिमिटेड संस्थेच्या वतीने कोळे येथील जिजाऊ वसतिगृहातील मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.

जनसहकार उद्योग समूहाचे संस्थापक व जिल्हा विकास समन्वय समितीचे सदस्य मारुतीराव मोळावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.

या वेळी संचालक काशिनाथ जाधव, मोरेवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य बाजीराव मोरे, विष्णू सपकाळ, संभाजी मोरे, अनिल मोरे, सुरेश पवार, शिवाजी मोळावडे, हिंदुराव इंदुलकर, रामचंद्र चव्हाण, यशवंत चव्हाण, सदाशिव ढेब, नारायण मोरे व जनसहकार निधी लिमिटेडचे कर्मचारी उपस्थित होते.