विद्यार्थ्यांनी यशस्वी उद्योजक व्हायचे स्वप्न मनाशी बाळगा: राजेश मंडलिक.



घोगाव| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना आपले ध्येय निश्चित केले पाहिजे व ते ध्येय साध्य करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले पाहिजे.आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी परिश्रमपूर्वक वाटचाल केली पाहिजे जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर जिद्द, चिकाटी व प्रबळ इच्छाशक्ती, सातत्य असणे गरजेचे आहे तरच आपण आपल्या कामात यशस्वी होऊ शकतो असे प्रतिपादन Setco Spindles Pvt.Ltd Pune  चे  CEO राजेश मंडलिक यांनी व्यक्त केले.

घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या श्री संतकृपा इंजिनिअरिंग (बी.टेक) या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या "Leadership Talk" या कार्यक्रम प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून  विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते.

यावेळी जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड पुणे चे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट डॉ. मधुसूदन चौधरी हे ही प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे इंडस्ट्रीज इंस्टिट्यूट  प्रमुख प्रसाद भागवत यांचीही उपस्थिती होती. 

सर्व मान्यवरांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी बुके देऊन महाविद्यालयाचे वतीने स्वागत केले व महाविद्यालयाची व संस्थेची विस्तृत माहिती प्रमुख अतिथीना करून दिली.

यावेळी पुढे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राजेश मंडलिक म्हणाले एखादा उद्योग उभा करताना, तो वाढवताना अनेक अडचणी येत असतात उद्योगात चढ-उतार होतच राहतो अडचणीवर मात करून पुढे जातो तोच यशस्वी होतो.

डॉ.मधुसूदन चौधरी यांनी विद्यार्थ्यांना उद्योगातील अनेक गोष्टीवर प्रकाश टाकला उद्योगातील लहान गोष्टीना सुद्धा महत्त्वाचे स्थान असते याबद्दल माहिती दिली व HDPE पाईप्स बद्दलची सखोल माहिती दिली तसेच भारतात व भारताबाहेरील देशातील प्रोजेक्ट मध्ये HDPE PIPES चे महत्व व उपयोग याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाग्यश्री पाटील यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय शितल औटे यांनी करून दिला.

यावेळी पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा ही घेण्यात आली यामध्ये बहुसंख्येने विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 

प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयात वेळोवेळी संपन्न झालेल्या स्पोर्ट्स, कल्चरल स्पर्धे मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला‌. 

सदर कार्यक्रमाचे नियोजन अतुल कोळेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजक व महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर अमित कुमार जगदाळे  यांनी सूत्रसंचालन व उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांचे आभार मानले.

.