शेंडेवाडी गावचे पोलीस पाटील संतोष पवार यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने जपली सामाजिक बांधिलकी.

 


तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा 

शेंडेवाडी तालुका पाटण गावचे पोलीस पाटील संतोष पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्यदिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.व पोलीस पाटील संघटना पाटण तालुका यांच्या वतीने नुतन पोलीस पाटील यांचा सत्कारही आयोजित करण्यात आला आहे.

आपण ज्या समाजात राहातो त्या समाजाप्रती आपल्या जबाबदारीचे भान ठेवत पाटण तालुक्यातील तळमावले येथील आदर्श संस्कार कॉम्पुटर चे इन्स्टिटय़ूट व शेंडेवाडी (कुंभारगाव) गावचे पोलीस पाटील संतोष पवार सर तसेच पाटण तालुका पोलीस पाटील संघ यांच्या वतीने व पोलीस पाटील संतोष पवार यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवार दिनांक 30 मे रोजी तळमावले येथे आदर्श संस्कार कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट येथे यशवंत ब्लड बँक कराड ही संस्था रक्तदान शिबीर साठी आयोजित केली आहे.

 तसेच या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपणाचाही उपक्रम राबवला जाणार आहे.

  या कार्यक्रमाचे औचित्य साधत पाटण तालुक्यातील नवनिर्वाचित पोलीस पाटील यांचा सत्कार समारंभ पाटण तालुका पोलीस पाटील संघ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 

या कार्यक्रमासाठी पाटण तालुक्याचे उपविभागीय अधिकारी सुनीलजी गाडे तसेच पाटण उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकजी लावंड,  तहसीलदार रमेश पाटील , ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार , पाटणचे पोलीस अधिकारी निंगप्पाजी चोखंडे ,मल्हारपेठ चे पोलीस अधिकारी उत्तमराव भापकर , कोयनानगर चे पोलीस अधिकारी नवनाथ गायकवाड , निवासी नायब तहसीलदार प्रशांत थोरात , मंडल अधिकारी प्रवीण शिंदे व संजय जंगडे तसेच पाटण तालुका पोलीस पाटील संघटनेचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

Popular posts
बंडखोरांना इशारा ते राजीनाम्याची तयारी... उद्धव ठाकरेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
इमेज
वा..वा..वा...प्रत्यक्षात भेटू त्यावेळी काढू फोटो... प्रवीणजी तरडे यांनी दिली स्वतःच्या चित्राला दाद
इमेज
कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स च्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश
इमेज
ज्ञानाची शिदोरी’ उपक्रमात सहभागी होण्याचे ‘स्पंदन’ ट्रस्ट चे आवाहन
इमेज
काजारवाडी येथील वि.का.स. सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी सुभाष काजारी तर व्हा. चेअरमन पदी हणमंत जंगम यांची बिनविरोध निवड.
इमेज