महादेव वरेकर यांची कुंभारगाव (बामणवाडी) पोलीस पाटील पदी निवड.


तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा:
कुंभारगाव (बामणवाडी) ता पाटण येथील पोलीस पाटील पद रिक्त होते. या साठी असणाऱ्या परीक्षेत कुंभारगाव ग्रामपंचायतीचे सदस्य महादेव वरेकर यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली. तसे त्यांना शासनाकडून नियुक्ती पत्रही देण्यात आले . 

महादेव वरेकर हे कुंभारगाव ग्रामपंचायत विद्यमान सदस्य असल्याने त्यांना अनेक कायदेशीर प्रक्रियेचा सामना करावा लागला परंतु या सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडत त्यांनी पोलीस पाटील हे ग्रामीण भागातील गावचे महत्त्वपूर्ण पद प्राप्त केले.  

या नियुक्ती बद्दल त्यांचे कुंभारगाव विभागातून सर्वत्र अभिनंदन होत आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. दिलीपराव चव्हाण, माजी जि प अर्थ क्रिडा सभापती संजय देसाई , कुंभारगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच राजेंद्र चव्हाण व गावातील ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.तर ढेबेवाडी पोलिस स्टेशनचे स.पो.नि. संतोष पवार यांनी ही त्यांचे अभिनंदन  केले.

 या वेळी महादेव वरेकर यांनी  स.पो.नि. संतोष पवार यांना पोलीस पाटील पदी नियुक्ती झाल्याचे पत्र दिले.

Popular posts
बंडखोरांना इशारा ते राजीनाम्याची तयारी... उद्धव ठाकरेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
इमेज
वा..वा..वा...प्रत्यक्षात भेटू त्यावेळी काढू फोटो... प्रवीणजी तरडे यांनी दिली स्वतःच्या चित्राला दाद
इमेज
कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स च्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश
इमेज
ज्ञानाची शिदोरी’ उपक्रमात सहभागी होण्याचे ‘स्पंदन’ ट्रस्ट चे आवाहन
इमेज
काजारवाडी येथील वि.का.स. सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी सुभाष काजारी तर व्हा. चेअरमन पदी हणमंत जंगम यांची बिनविरोध निवड.
इमेज