काजारवाडी सोसायटीत शिवसिद्धनाथ हनुमान शेतकरी विकास पॅनेलचा दणदणीत विजय , तर विरोधी शंभूराज देसाई शेतकरी विकास पॅनेलचा दारुण पराभव .


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
खळे काजारवाडी (ता.पाटण) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत शिवसिद्धनाथ हनुमान शेतकरी विकास पॅनेलने मोठा विजय संपादन केला आहे.या वेळी त्यांनी १० जगांवर दणदणीत विजय मिळवला आहे.

तर विरोधी शंभूराज देसाई शेतकरी विकास पॅनेलचा एकच बिनविरोध उमेदवार झाला. बाकी 10 उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले.

या सोसायटीच्या निवडणुकीसाठी एकूण 225 सभासद असणाऱ्या पैकी 205 सभासदांनी बुधवार दि 18/5/2022 रोजी मतदान केले त्यानंतर मतमोजणी झाली निवडणूक निर्णय अधिकारी आर.आर.मोरे यांनी निकाल जाहीर केला.

या मध्ये शिवसिद्धनाथ हनुमान शेतकरी पॅनेलने मोठा विजय संपादन केला . 

नवनिर्वाचित संचालक पाडुरंग काजारी, महेंद्र काजारी, सुभाष काजारी, प्रल्हाद घागरे, प्रकाश डुबल, सुरेश डुबल, राजेश राजपूत, निवास शिद्रुक, तानूबाई काजरी ,सुमन डुबल, हनमंत जंगम यांचा समावेश आहे.

पॅनेल प्रमुख रामभाऊ डुबल, सुभाष काजारी, रमेश राजपूत, सचिन काजारी, बाळकृष्ण काजारी सर, दिलीप अण्णा फौजी व कार्यकर्ते यांनी मोठा विजयी जल्लोष साजरा केला.

Popular posts
बंडखोरांना इशारा ते राजीनाम्याची तयारी... उद्धव ठाकरेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
इमेज
वा..वा..वा...प्रत्यक्षात भेटू त्यावेळी काढू फोटो... प्रवीणजी तरडे यांनी दिली स्वतःच्या चित्राला दाद
इमेज
कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स च्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश
इमेज
ज्ञानाची शिदोरी’ उपक्रमात सहभागी होण्याचे ‘स्पंदन’ ट्रस्ट चे आवाहन
इमेज
काजारवाडी येथील वि.का.स. सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी सुभाष काजारी तर व्हा. चेअरमन पदी हणमंत जंगम यांची बिनविरोध निवड.
इमेज