सारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा 
सनबिम उद्योग समूहाचे चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आयटी सेलचे प्रदेश प्रमुख सारंग श्रीनिवास पाटील (बाबा) यांचा ५० व्या वाढदिवसाचे औचित्य साधत संजीवन प्रतिष्ठान कुंभारगाव व नवभारत पतसंस्था तळमावले यांच्या संयुक्त विद्यमानाने जि.प. कुंभारगाव क्रेंद शाळा या ठिकाणी शाळेतील मुलांना वह्या वाटप करण्यात आले.

सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण,अर्थ सभापती संजय देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला .

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम यांनी प्रास्ताविक भाषण केले त्या वेळी त्यांनी सनबिम उद्योग समूहाचे चेअरमन सारंग पाटील यांना शाळेच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

त्या नंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आभार संजीवन प्रतिष्ठानचे प्रा सचिन पुजारी यांनी मानले . 

यावेळी राजेंद्र पुजारी, विजय कचरे (नाना), रवी देसाई, पृथ्वीराज चव्हाण, राजवर्धन चव्हाण , तन्मय मस्कर, विकास चव्हाण (गुरूजी ), मुख्याध्यापिका चव्हाण मँडम , प्रतिक सागावकर, विकास माने व शुभम गुरव उपस्थित होते.

Popular posts
बंडखोरांना इशारा ते राजीनाम्याची तयारी... उद्धव ठाकरेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
इमेज
वा..वा..वा...प्रत्यक्षात भेटू त्यावेळी काढू फोटो... प्रवीणजी तरडे यांनी दिली स्वतःच्या चित्राला दाद
इमेज
कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स च्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश
इमेज
ज्ञानाची शिदोरी’ उपक्रमात सहभागी होण्याचे ‘स्पंदन’ ट्रस्ट चे आवाहन
इमेज
काजारवाडी येथील वि.का.स. सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी सुभाष काजारी तर व्हा. चेअरमन पदी हणमंत जंगम यांची बिनविरोध निवड.
इमेज