सौ.भारती पुजारी एक आदर्श शिक्षिका : ए.एम.मणेर.

तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

उंब्रज ता कराड येथील रयत शिक्षण संस्थेचे श्रीमती रुक्मिणीबाई पांडुरंग कदम कन्या विद्यालयातील उपशिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या सौ भारती सुभाष पुजारी या दि. 30/4/2022 रोजी सेवानिवृत्त झाल्या बद्दल विद्यालयात सत्कार समारंभ संपन्न झाला.

 यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सहाय्यक विभागीय अधिकारी माध्यमिक विभाग सातारचे ए, एम, मणेर साहेब उपस्थित होते. तर अध्यक्ष स्थानी जनरल बाॅडी सदस्य द श्री जाधव उपस्थित होते. यावेळी मणेर साहेब मनोगत व्यक्त करताना म्हणाले भारती पुजारी एक आदर्श शिक्षिका आहेत. शांत, संयमी व्यक्तिमत्व होय. त्यांचा प्रामाणिकपणा व विद्यार्थींविषयी प्रेम,आपूलकि याचा आदर्श इतरांनी घ्यावा. त्यांच्या सेवाकाळात त्यांनी विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देऊन भारताचे आदर्श नागरिक घडवले. त्यांचा प्रगल्भ अभ्यास विद्यार्थ्यांना शिकवण्याची शिक्षण पद्धती ही खरोखर वाखाणण्यासारखी आहे त्यांचा आदर्श शैक्षणिक क्षेत्रात येणाऱ्या सर्व शिक्षकांनी घ्यावा असाच आहे. यापुढेही भविष्यकाळात या विद्यालयास त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल.

  यानंतर शिक्षक प्रतिनिधी शैला लोहार व मनिषा निकम मॅडम यांनी आपल्या जड अंतकरणाने भावनांना वाट मोकळी केली.यावेळी बोलताना त्या म्हणाल्या भारती पुजारी यांनी 28 वर्ष अविरत सेवा करत असताना इयत्ता 10 तील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे अध्यापन करून 100 टक्के निकालाची परंपरा जोपासण्याचे महत्त्वपूर्ण काम केले.    

  यावेळी त्यांच्या परिवाराच्या वतीने सुभाष पुजारी सर, नातेवाईक संगीता शरद गुरव,चैत्राली गुरव, चि सचिन पुजारी, विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  

  सत्काराला उत्तर देताना भारती पुजारी यांनी ज्ञानदानाच्या क्षेत्रातील अनेक अनुभव उपस्थितांना सांगितले. या वेळी त्यांनी एक मौलिक संदेशही उपस्थितांना दिला त्यावेळी त्या म्हणाल्या राग आला तर थोडं थांबलं आणी चुक झाली की नमलं की कोणत्याही संकटावर मात करता येते. कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या त्यागातून रयत शिक्षण संस्था उभी राहिली आहे त्यामुळे रयत शिक्षण संस्थेची मी ऋणी आहे ही भावना व्यक्त केली. यानंतर सर्व शिक्षक, सेवक वर्ग उपस्थिताचे त्यांनी आभार मानले. 

 यावेळी चिरंजीव सचिन सुभाष पुजारी याची व्हाल्वो कार कंपनी या परदेशी कंपनीमध्ये सिनिअर इंजिनिअर पदी निवड झालेने मान्यवरांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. 

 यानंतर शिवछत्रपती सोशल क्लब उंब्रज यांचे वतीने सौ.भारती सुभाष पुजारी यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या सत्कार प्रसंगी स्कूल कमेटी सदस्य सुरेशराव साळुंखे, संजय पाटील, सरपंच योगराज जाधव, आंतरराष्ट्रीय बेल्ट रेसलिंग कोच पै. प्रल्हाद जाधव, बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बी आर पाटील, विलासराव कदम विविध शाखांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, नातेवाईक, मित्रपरिवार मोठया संख्येने उपस्थित होते.