श्री संतकृपा डी फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या वैशाली पाटील यांना पी.एच.डी. पदवी प्रदान.


कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या श्री संतकृपा डी फार्मसी या महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ वैशाली अमर पाटील यांनी पॅसिफीक युनव्हसिटी उदयपूर, राजस्थान या विद्यापीठातून फायटोकेमिकल अँड फार्माकोलॉजीकल इव्हॅल्यूएशन ऑफ सिसबँनिया ग्रॅन्डीफ्लोरा फॉर काॅगनिशन एनहान्सींग ॲक्टीव्हीटी™ या विषयातून त्यांनी नुकतीच पी. एच. डी. पदवी प्राप्त केली. 

त्यांना हि पदवी प्राप्त करण्यासाठी डॉ. किरण वाडकर, डॉ. अमितकुमार रावळ यांचे मार्गदर्शन लाभले.

त्यांच्या या उज्वल यशाबद्दल श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, संस्थेच्या ट्रस्टी प्राजक्ता जोहरी,संस्थेचे सर्व संचालक, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजयानंद अरलेलीमठ, श्री संतकृपा इंजिनिअरिंग (बीटेक) चे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, श्री संतकृपा ज्युनिअर कॉलेजच्या च्या प्राचार्या सौ पुष्पा पाटील, संतकृपा इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या सौ. सुप्रिया पाटील, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, फार्मसी महाविद्यालयाचे विद्यार्थी वर्ग यांनी अभिनंदन केले.