तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
रयत शिक्षण संस्थेच्या काळगांव ता.पाटण येथील न्यू इंग्लिश स्कूल मधील इयत्ता 2000 च्या बॅचमधील इ.10 वीच्या वर्गातील विद्यार्थी तब्बल 22 वर्षानी एकमेकांना भेटले. पुणे, मुंबई, मध्यप्रदेश व अन्य ठिकाणाहून आलेल्या मित्र मैत्रिणींनी आपल्या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. डाॅ.संदीप डाकवे यांनी या जुन्या मित्रांना एकत्र आणण्याचे ठरवले आणि सुरु झाली फोना फोनी...! एक एक करत 56 जणांना संपर्क झाला आणि शाळेत केलेल्या गमती जमतींना उजाळा देण्यासाठी सर्वजण आतुर झाले. सोशल मिडीयावर याचा एक ग्रुप ही तयार केला आहे. काही जणांना या मेळाव्यास उपस्थित न राहता आल्याबद्दल खंत व्यक्त केली.
दरम्यान त्यावेळचे शिक्षक डी.एस.पाटील, कदम बी.डी., शेडगे सर यांच्यासह एस.एम.खरात, व्ही.टी.पाटील हे दोघे सपत्नीक उपस्थित होते. प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील, लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमांचे पुजन झाल्यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली. शाळेचे सध्याचे मुख्याध्यापक देसाई सर, लटके सर, भरत कुुंभार सर, महादेव थोरात सर यावेळी उपस्थित होते. संदीप डाकवे, विकास काळे, जनार्दन सुतार, प्रवीण कुंभार यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच शिपाई बी.एस.पाटील हे 31 मे रोजी सेवानिवृत्त होत असल्याबद्दल त्यांचाही या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. उपस्थित शिक्षकांचे शाल, श्रीफळ, कृतज्ञता पत्र देवून सर्व माजी विद्यार्थ्यांनी स्वागत केले. याशिवाय माजी मुख्याध्यापक एस.आर.पाटील हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमास येवू शकले नाहीत, त्यामुळे त्यांनी मोबाईलवरुन संवाद साधून या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास सतीश येळवे, संदीप कुंभार, दिनेश डाकवे, जनार्दन सुतार, तात्याजी लोटळे, संजय लोटळे, रमेश तवर, सविता देसाई, विकास काळे, संदीप डाकवे, प्रवीण कुंभार हे माजी विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान, सर्व विद्यार्थ्यांनी शाळेस फुल ना फुलाची पाकळी मदत म्हणून रु.11,111/- ची देणगी रोख स्वरुपात दिली. सदर कार्यक्रमास डाॅ.स्मिता नाईक-जाधव, विद्या बावडेकर-साळुंखे, अशोक घराळ, शंकर मस्कर, नवनाथ लोहार, संतोष डाकवे या माजी विद्यार्थ्यांनीही मदत केली. 2000 च्या 10 वी च्या बॅचने तब्बल 22 वर्षानंतर वर्गात बसून शाळा अनुभवली. विद्यार्थी आणि शिक्षक गप्पांत रमले होते. अनेकजण गहिवरुन गेले होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.संदीप डाकवे यांनी तर सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन विकास काळे यांनी मानले.
-------------------------------------------------------------शिक्षक भारावून गेले.
तत्कालीन मुख्याध्यापक एस.आर.पाटील, परीट एन.बी., घराळ जी.एन., मधुकर भस्मे, वीर सर या सर्व शिक्षकांच्या घरी जावून विद्यार्थ्यांनी त्यांना कृतज्ञता पत्र, शाल, श्रीफळ देवून त्यांच्याप्रती ऋण व्यक्त केले. या आपुलकीच्या सत्काराने सर्व शिक्षक वृंद भारावून गेले.
---------------------------------------------------------