बनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय

तर विरोधी नाईकबा शेतकरी विकास पॅनेलचा दारुण पराभव.

तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा : 

बनपुरी ता पाटण येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे नेतृत्व मानणाऱ्या शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलने मोठा विजय संपादन केला आहे. यावेळी त्यांनी सर्वच्या सर्व 13 जागांवर दणदणीत विजय मिळविला आहे. 

तर विरोधी नाईकबा शेतकरी विकास पॅनेलला एक ही उमेदवार निवडून आणता आला नाही त्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या सोसायटीच्या निवडणुकीसाठी एकूण सभासद 722 सभासद असणाऱ्या पैकी 438 सभासदांनी गुरुवार दि 12/5/2022 रोजी मतदान केले त्यानंतर मतमोजणी झाली निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना थोरात यांनी निकाल जाहीर केला.त्यांना ् रतन देसाईं यांनी सहकार्य केले.

नूतन विजयी संचालक श्रीरंग बंडू जगदाळे, भागवत कमलाकर पाटील, बाळू बाजीराव पाटील, संतोष मारुती पाटील, प्रमोद बाबुराव पाटील, तानाजी शंकर फडतरे, बबन ज्ञानदेव भालेकर, आनंदराव शामराव मोकाशी, सुवर्णा अरुण कचरे, संगीता विलास पवार, आनंदा यशवंत कुंभार, सचिन विष्णू कांबळे, राजाराम रघुनाथ लोहार यांचा समावेश आहे.

पॅनेल प्रमुख उदयोजक महेश पाटील, संजय भिलारे, संपतराव पाटील, विक्रम जगदाळे, जगन्नाथ देसाई, भगवान पाटील, धनाजी नागवडे व कार्यकर्ते यांनी गुलाल उधळत मोठा विजयी जल्लोष साजरा केला. 

या निवडणुकीसाठी ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे स.पो.नि संतोष पवार यांचे मार्गदर्शना खाली त्यांचे सहकारी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता यावेळी बनपुरीचे पोलीस पाटील दत्तात्रय कुंभार उपस्थित होते.