काळगांव येथील वि.का. स.सेवा सोसायटीत यशवंतराव चव्हाण शेतकरी सोसायटी बचाव पॅनेलचा दणदणीत विजय. 13-- 0 ने मोठा विजय प्राप्त.तर शिवशंभू ग्रामविकास पॅनेलचा दारुण पराभव.

   


तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

 काळगाव विभागांमध्ये बहुचर्चित ठरलेली, सोशल मीडियावर कायम चर्चेत राहिलेली व पाटण तालुक्यात लक्षवेधी ठरलेली काळगांव ता पाटण येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत यशवंतराव चव्हाण शेतकरी सोसायटी बचाव पॅनेलने 13- 0 करत मोठा विजय संपादन केला. विरोधी शिवशंभू ग्रामविकास पॅनेलला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

 या सोसायटीचे एकूण 1319 सभासद या पैकी 726 सभासदांनी रविवार दि 8/5/2022 रोजी मतदान केले. आज मतमोजणी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी गीतांजली कुंभार यांनी निकाल जाहीर केला. या मध्ये यशवंतराव चव्हाण शेतकरी बचाव पॅनेलने 13 - 0 करत मोठा विजय संपादन केला. सर्वच्या सर्व उमेदवारानी जादा मते घेत मोठ्या फरकाने विजय संपादन केला तर विरोधी शिवशंभू ग्रामविकास पॅनेलला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. त्यामुळे 15 वर्षाची सत्ता संपुष्ठात आली. 

नूतन विजयी संचालक युवराज अनाम काळे, सुनील रामचंद्र तेटमे , सुभाष महादेव पाटील, रघुनाथ शंकर बावडेकर, यशवंत एकनाथ येळवे, एकनाथ भिकाजी सावंत, किसन नामदेव सावंत, किसन रामचंद्र सावंत, विजय वामन काळे, वैशाली बाबासो पवार,शरद तातोबा जगताप, विलास गोविद नाईक, बाबुराव रामचंद्र पुजारी.

  नवनिर्वाचित संचालक व पॅनेल प्रमुख, कार्यकर्ते यांनी गुलाल उधळत मोठा विजयी जल्लोष साजरा केला.

यशवंतराव चव्हाण शेतकरी सोसायटी बचाव पॅनेलचे नेते, सक्रिय कार्यकर्ते, सभासद यांचे परिश्रम, व सोसायटी बचाव चा नारा, यामुळेच हा विजय प्राप्त झाला असल्याचे मत यशवंतराव चव्हाण शेतकरी सोसायटी बचाव पॅनेलचे प्रमुख नेते मंडळींनी व्यक्त केले.