गुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .

 

तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

गुढे ता पाटण येथील वि. का स. सेवा सोसायटीत शिवसेना पुरस्कृत श्री काळंबादेवी शेतकरी परिवर्तन पॅनेलने 20 वर्षांनंतर सत्तातर करत 13-0 ने दणदणीत विजय संपादन केला तर विरोधी जोतिर्लिंग शेतकरी विकास पॅनेलचा दारुण पराभव झाला.

गुढे ता पाटण येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत श्री काळंबादेवी शेतकरी परिवर्तन पॅनेलने 13- 0 ने 20 वर्षाने सत्तातर करत मोठा विजय संपादन केला. विरोधी राष्ट्रवादीच्या जोतिर्लिंग शेतकरी विकास पॅनेलला पराभवाला सामोरे जावे लागले. या सोसायटीच्या निवडणुकीसाठी एकूण सभासद 461 त्यापैकी 280 पात्र सभासद तर 273 सभासदांनी रविवार दि 15/5/2022 रोजी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर दुपारी मतमोजणी झाली निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना थोरात यांनी निकाल जाहीर केला.त्यांना साह्य रतन देसाई यांनी केले या मध्ये श्री काळंबादेवी परिवर्तन पॅनेलने 13-0 करत सर्वच्या सर्व उमेदवारानी जादा मते घेत मोठ्या फरकाने विजय संपादन केला तर विरोधी जोतिर्लिंग शेतकरी विकास पॅनेलला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही.  

नूतन संचालक भाऊसो शंकर कदम, अशोक हिंदुराव देसाई, नारायण परशराम पाटील, रविंद्र आनंदराव पाटील, श्रीरंग राजाराम बोबडे, हणमंत श्रीपती मस्कर, शिवाजी श्रीपती माने, उमेश शामराव शिबे, कांचन आनंदा कदम, अनुसया यशवंत पाटील, दिपक परशराम सुतार, सदाशिव महादेव नलवडे, अधिक बाबुराव तडाखे. हे उमेदवार विजयी झाले.

या  विजयी पॅनलचे प्रमुख शामराव कदम, सरपंच आत्माराम पाचपुते, आबासाहेब बोत्रे, अशोकराव दिंडे, सुभाष पाटील आबा नांगरे पाटील, धनाजी पाचपुते, जयवंत शिबे, अरुण शिबे, गणेश शिबे, धनाजी दिंडे, जयवंत दिंडे, सागर पाटील, दीपक पाटील, रामचंद्र पाटील, पप्पू पाटील, संभाजी पाचपुते, बाबू माने, आप्पासो नलवडे, आबासो शिबे, आबासो भांडवलकर, विश्रांत कदम, आनंदा महाडिक, मिलिंद जाधव, दिपक रामचंद्र कदम, अण्णा निलेश पाटील, संजय कदम, शंकर कदम,  व सर्व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत मोठा विजयी जल्लोष साजरा केला.                    

 सर्व विजयी उमेदवार, पॅनल प्रमुख, कार्यकर्ते व सभासदांचे राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी खास अभिनंदन केले.