चाळकेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह पारायण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न.


कुंभारगाव| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

चाळकेवाडी (कुंभारगाव) ता पाटण येथे अखंड हरिनाम सप्ताह पारायण सोहळा गुरुवार दि 7/4/2022रोजी संपन्न झाला. गेले दोन वर्ष कोविडच्या संसर्गाच्या पार्श्ववभूमीवर सर्व सार्वजनिक, धार्मिक समारंभावर निर्बंध होते त्यामुळे कोणतेही सार्वजनिक समारंभ पार पडले नाहीत परंतु सध्या शासनाने निर्बंध शिथिल केलेने चाळकेवाडी ता पाटण येथे पारायण सोहळा उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. शेवटच्या दिवशी सकाळी श्रीचे पालखीतून "ज्ञानोबा तुकाराम" गजर करत मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी गोलरिंगण फुगडी खेळत, दिंडी चाळकेवाडी मान्याचीवाडी मार्गे भक्तिमय वातावरणात परत ज्ञान मंडपात चाळकेवाडी येथे पोहचली. नंतर काल्याचे किर्तन ह भ प यशवंत महाराज कुंभारगावकर यांचे झाले. त्यानंतर 8 दिवस ज्ञानदान केले त्या ह भ प महाराज यांचे मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ, मानपान देऊन सत्कार करण्यात आला.  या वेळी ज्ञानदान मंडपात ग्रामस्थ, महिला वर्ग, ग्रामस्थ बहूसंख्येने उपस्थित होते.

या वेळी उपस्थित सर्व भाविक भक्त यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. गेले दोन वर्ष भाविकांना कोरोनाच्या संकटाने कीर्तन, पारायण याचा आनंद घेता आला नाही. यावेळी मात्र सर्व उपस्थित असणाऱ्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून आला. या पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे नियोजन संत चरणरज, ग्रामस्थ मंडळ चाळकेवाडी यांनी केले.