विजयी उमेदवारांचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केले अभिनंदन.
मौजे गलमेवाडी ता पाटण येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी पंचवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत श्री नाईकबा विकास पॅनेलने दणदणीत विजय संपादन केला. विरोधी श्री नाईकबा ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला या सोसायटीच्या निवडणुकीसाठी एकूण सभासद मतदार 183,पैकी पात्र सभासद 110 असून त्या पैकी 103 सभासदानी मंगळवार दि.26/4/2022 रोजी मतदान केले त्यानंतर मतमोजणी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी संजय मोरे यांनी निकाल जाहीर केला. यामध्ये श्री नाईकबा विकास पॅनेलचे सर्वच्या सर्व 11 उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. विरोधी पॅनेलला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. 11- O असा निर्णायक विजय श्री नाईकबा विकास पॅनलने संपादन केला.तर श्री नाईकबा ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचा दारुण पराभव झाला.
यानंतर विजयी उमेदवार व पॅनेल प्रमुख वसंतराव हारुगडे, दत्तात्रय चोरगे, महेश चोरगे, अगस्त चोरगे, दादासो चोरगे, उमेश चोरगे, विठ्ठल चोरगे, शशिकांत चोरगे, अधिक चोरगे, यांनी नाईकबा देवाचे दर्शन घेऊन विजयी जल्लोष साजरा केला. विजया नंतर बा.दे.सा. कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण, माजी जि.प. अर्थ शिक्षण सभापती संजय देसाई, उपसरपंच राजेंद्र चव्हाण, साईराज को ऑप क्रेडिट सोसायटीचे संस्थापक / अध्यक्ष चंद्रकांत चाळके यांनी विजयी उमेदवार व पॅनेल प्रमुख यांचे अभिनंदन केले.
विजयी उमेदवार सर्वसाधारण प्र वर्गातून, चोरगे आंनदा शामू, चोरगे केशव हरी, चोरगे दत्तात्रय सोनाप्पा, चोरगे धोंडीराम गणपती, चोरगे बाळकृष्ण शंकर, चोरगे मारुती बाळकू, चोरगे वसंत चंदर, हारुगडे सचिन तुकाराम, महिला राखीव मधून, चोरगे शांताबाई राजाराम, चोरगे हौसाबाई लक्ष्मण, इतर मागास प्रवर्ग मधून चोरगे दत्तात्रय लक्ष्मण हे 11 उमेदवार विजयी झाले.