लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले अभिवादन


पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त दौलतनगर ता. पाटण येथील त्यांच्या पुर्णाकृती पुतळयास गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.  

 या प्रसंगी रविराज देसाई, यशराज देसाई यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गृह राज्यमंत्री श्री. देसाई व मान्यवरांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांना अभिवादन केल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुर्णाकृती पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस बॅन्डपथकाने राष्ट्रीय गीत वाजवून मानवंदना दिली.