गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी घेतल्या कार्यकर्त्यांच्या भेटी.

निगडे गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते दत्तात्रय पाटील व मुळगावंचे हंबीरराव देसाई यांच्या तब्ब्येची केली विचारपूसपाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
निगडे गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते दत्तात्रय पाटील हे वयोवृध्द कार्यकर्ते ना.शंभूराज देसाई यांच्या भेटीचा आग्रह धरला होता.तर मुळगाव येथील हंबीरराव देसाई हे त्यांच्या आजारपणामुळे अंथरुणावर असल्याने त्यांनीही ना.शंभूराज देसाई यांनी घरी भेट देण्यासाठी कार्यकर्त्यांकडे निरोप दिला होता. ज्येष्ठ व प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या इच्छाखातर महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी मंगळवार व बुधवारी पाटण तालुक्यातील निगडे गावचे ज्येष्‍ठ कार्यकर्ते श्री.दत्तात्रय पाटील व मुळगावचे कार्यकर्ते हंबीरराव देसाई यांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्ब्येची विचारपूस केली. कार्यकर्त्यांच्या घरी भेट दिली.ना.शंभूराज देसाई यांनी अचानक दिलेल्या या घर भेटीमुळे निगडे येथील पाटील व मुळगावचे देसाई कुटुंबिय भारावुन गेले.           लोकनेते बाळासाहेब देसाई यांचेपासून विश्वासू कार्यकर्ते म्हणून काम केलेले निगडे येथील दत्तात्रय पाटील म्हणून ढेबेवाडी विभागामध्ये परिचित आहेत.गेली दोन वर्ष कोविडच्या काळामध्ये ना.शंभूराज देसाई राज्यमंत्री होऊनही भेट घेता आली नव्हती. त्यामुळे दत्तात्रय पाटील यांनी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांकडे आग्रह धरला होता. दत्तात्रय पाटील हे ज्येष्ठ व वयोवृध्द असल्याने ना.शंभूराज देसाई यांनी त्यांचा आग्रह मान्य करत त्यांची निगडे येथील राहत्या भेट देऊन त्यांच्या तब्ब्येची विचारपूस केली. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी वेळवर जेवण करता का ? औषधं गोळया वेळेवर घेता का? अशी आस्थेवाईकपणे त्यांची विचारपूस करत सारखी आठवण काढत असल्याने तुम्हाला भेटण्यासाठी निगडे या ठिकाणी आलो असल्याचे सांगत वेळेवर जेवण करुन औषध गोळया घेऊन स्वत:ची काळजी घ्या असे सांगीतले.यावेळी दत्तात्रय पाटील यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांची आवर्जुन आठवण काढत या तालुक्यासाठी लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी मोठया खस्ता खाल्याचे दत्तात्रय पाटील यांनी यावेळी सांगीतले.तर मुळगाव येथील हंबीरराव देसाई हे अर्धांगवायूमुळे आजारी असल्याने त्यांना बाहेर जात येत नसल्याने त्यांनी ना.शंभूराज देसाई यांना भेटण्याचा आग्रह केला होता. देसाई यांच्या आग्रहाखातर ना.शंभूराज देसाई यांनी मुळगाव येथे त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या तब्ब्येची विचारपूस करत वेळेवर औषधं घेऊन तब्येतीची काळजी घेण्यास सांगीतले.
_______________________________

ज्येष्ठ कार्यकर्त्याच्या इच्छेखातर लगेच केला सरकारी औषधोपचार.

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी निगडे येथील दत्तात्रय पाटील यांना वेळेवर औषधे गोळया घेता का असा प्रश्न विचारल्यानंतर पाटील यांनी सरकारी दवाखान्यातील औषधोपचार पाहिजे अशी इच्छा ना.शंभूराज देसाई यांचेकडे व्यक्त केली. यावेळी ना.शंभूराज देसाई यांनी दत्तात्रय पाटील यांना आपण घरीच सरकारी डॉक्टर बोलवून उपचार करुन तुम्ही काळजी करु नका असे सांगत या अगोदर दत्तात्रय पाटील यांनी मोफत सरकारी औषधोपचार करण्याची इच्छा एकदा ना.शंभूराज देसाई यांचेकडे व्यक्त केली होती.ज्येष्ठ कार्यकर्त्याने केलेल्या इच्छेखातर त्यांनी तातडीने ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना औषधोपचार करण्याच्या सूचना केल्यानंतर ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची टिम तातडीने निगडे येथील दत्तात्रय पाटील यांच्या घरी जाऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करुन आवश्यक ते औषधोपचार करण्यात आले.आपल्या जेष्ठ कार्यकर्त्याच्या इच्छेखातर ना.देसाई यांनी लगेचच सरकारी औषधोपचार करत त्यांची इच्छा पुर्ण केल्याने पाटील कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले.
_______________________________

भेट दिलेल्या कार्यकर्त्यांच्या घरी पोहोच केली फळे व ड्रायफुट्स.

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी निगडे येथील ज्येष्ठ कार्यकर्ते दत्तात्रय पाटील व मुळगाव येथील हंबीरराव देसाई यांचे घरी भेट देऊन त्यांच्या तब्ब्येची आस्थेवाईकपणे विचारपूस करत वेळेवर औषधोपचार घेऊन तब्येची काळजी घ्या असे त्यांना सांगीतले.तसेच ना.शंभूराज देसाई यांनी दुसऱ्या दिवशी लगेच निगडयाचे दत्तात्रय पाटील व मुळगावचे हंबीरराव देसाई यांचेकरीता फळे व ड्रायफुट्स त्यांचे घरी पोहोच केली.
_______________________________