कुंभारगाव वि.का.स.सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी रामराव इनामदार तर व्हा चेअरमन पदी शशिकांत किर्तने यांची बिनविरोध निवड.


तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

  पाटण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या कुंभारगाव ता पाटण येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी विकास पॅनेलने मोठा विजय संपादन करून सत्ता अबाधित ठेवली होती. विरोधी रयत परिवर्तन पॅनेला एक ही उमेदवार निवडून आणता आला नाही. सोसायटीच्या 13 जागांपैकी शेतकरी विकास पॅनेलचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला होता तर राहिलेल्या 12 जागांसाठी अटीतटीची लढत झाली होती यात शेतकरी विकास पॅनेलने सर्वच्या सर्व 1२ जागा जिंकून मोठा विजय संपादीत केला होता. मंगळवार दि 5/3/2022 रोजी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडी संपन्न झाल्या. या मध्ये चेअरमन पदी रामराव इनामदार तर व्हा.चेअरमन पदी शशिकांत किर्तने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

शेतकरी पॅनेलचे प्रमुख डॉ दिलीपराव चव्हाण, माजी शिक्षण व अर्थ सभापती संजय देसाई विद्यमान उपसरपंच राजेंद्र चव्हाण व सर्व नवनिर्वाचित संचालक यांचे प्रमुख उपस्थितीत या पदाच्या निवडी संपन्न झाल्या.

 निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून थोरात मॅडम यांनी काम पहिले त्यांना सचिव रत्नाकर देसाई यांनी सहकार्य केले.

   यावेळी नवनिर्वाचित चेअरमन रामराव इनामदार यांचा सत्कार माजी चेअरमन भिमराव चव्हाण यांनी केला तर व्हा. चेअरमन शशिकांत किर्तने यांचा सत्कार संचालक भरत चाळके यांनी केला. यावेळी बाळासाहेब देसाई सह साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ दिलीपराव चव्हाण, माजी जि प अर्थ शिक्षण सभापती संजय देसाई, कुंभारगाव ग्रामपंचायत उपसरपंच राजेंद्र चव्हाण, सोसायटीचे सर्व संचालक,माजी पंचायत समिती सदस्य रघुनाथ माटेकर,देवबा शंकर वायचळ (सर) आबा माटेकर (शेठ ),संदीप चव्हाण, युवानेते धनाजी चाळके, शिवाजी सुर्वे, युवानेते उदयसिंह चव्हाण, दिपक चव्हाण,माजी संचालक उदयसिंह शिवाजी चव्हाण, दिलीप घाडगे, तानाजी वरेकर, विशाल मोरे, अनिल डांगे, उमेश घाडगे, ग्रामस्थ पॅनेलचे कार्यकर्ते उपस्थित होते.