नगरपालिका व आमदार यांचा समन्वय असल्यास कराडचा विकास गतीने होईल:माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण.




राड: कोयनेश्वर मंदिर सुशोभीकरण भूमिपूजन प्रसंगी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राजकुमार नलवडे, शिवराज मोरे, श्रीकांत मुळे, आप्पा माने व अन्य.

कराड| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

कराड शहराच्या तीन बाजूंनी कृष्णा व कोयना नदी आहे. नदीकाठचा असा निसर्ग लाभलेले शहर अन्यत्र नाही. त्यामुळेच या नदीकाठाने संरक्षक भिंत आणि परदेशातील शहरांच्या धर्तीवर वॉक वे करण्याचे आपले स्वप्न आहे. शहराच्या विकासाचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी नगरपालिका आणि आमदार यांच्यात समन्वय हवा. तो असल्यास विकास गतीने होईल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

येथील शनिवार पेठेतील कोयनेश्वर मंदिर सुशोभीकरण व बंदिस्त गटर कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, नवजवान ग्रुपचे मार्गदर्शक राजकुमार नलवडे, माजी नगरसेवक मजहर कागदी, अशोकराव पाटील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष आप्पा माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, फारुक पटवेकर, दत्तात्रय मुळे, मोहन लोखंडे, राजू काटवटे, दिनेश नलवडे, इरफान सय्यद, विजय मुठेकर, महेश काळेकर, उदय भोकरे, इसाक मुजावर, शौकत मुल्ला यांची उपस्थिती होती.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कराड शहराच्या जितका विकास करता येईल तितका करण्याचा प्रयत्न केला आहे. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीचा सर्वाधिक निधी कराडला दिला. परंतु ग्रामीण भागात जितकी कामे देता आली, तितकी गतीने कामे कराड शहरात देण्यात अडचणी आल्या. नगरपालिकेकडून प्रस्ताव आले नाहीत. त्यामुळे नगरपालिका आणि आमदार यांच्यात समन्वय असल्यास विकास गतीने करता येईल. कराडच्या विकासाचे आपले एक स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. कोयनेश्वर मंदिर घाटाच्या विस्तारासाठी आणखी निधी देण्यात येईल.

शिवराज मोरे यांनी कृष्णा काठच्या तुलनेत कोयना नदीकाठचा विकास झालेला नसल्याचे सांगत संरक्षक भिंत, वाकवे पूर्ततेसाठी बाबांनी प्रयत्न करावेत, असे सांगितले. इरफान सय्यद यांनी कोयनेश्वर परिसरात बगीचाची निर्मिती करण्याची मागणी केली. तर मजहर कागदी यांनी, कोयनेश्वर परिसरातून महामार्गावर जाण्यासाठी पूल व्हावा, अशी मागणी केली.

माजी नगरसेवक श्रीकांत मुळे यांनी स्वागत व आभार मानले.

कार्यक्रमास काँग्रेसचे सरचिटणीस प्रदीप जाधव, राजू डुबल, भास्कर देवकर, झाकीर पठाण, संभाजी सूर्यवंशी, शिवलिंग नलवडे,विनोद चव्हाण, इंद्रजीत चव्हाण, राजेंद्रआबा यादव, ऋतुराज मोरे, सुजित जाधव, जितेंद्र ओसवाल, मोहनराव चव्हाण साजुरकर, सूनील बरिदे, राजेंद्र पवार, फिरोज कागदी, मोहसीन कागदी, महेश काटवटे, श्रीरंग पाडळे, मुकुंद काटवटे ,निलेश चौगुले,राजेंद्र डुबल,गणेश कांबळे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.