कदमवाडी येथील जळीतग्रस्त कुटुंबास शिवसमर्थ संस्थेची आर्थिक मदत


शिराळा| कृष्णाकाठ वृत्तसेवा :
शित्तूर - वारूण (ता.शाहुवाडी) पैकी कदमवाडी येथे शिवसमर्थ पतसंस्थेतर्फे जळीतग्रस्त कुटुंबास संस्थेचे चेअरमन अॅड. जनार्दन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ३५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.

कदमवाडी येथे ३० मार्च रोजी तेरा खणी तिजईच्या घरास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली होती. यामध्ये सुमारे तीस लाख रुपयांचे नुकसान झाले. या आगीत पशुधन व सगळे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. जनावरांना वाचविताना होरपळलेल्या नामदेव कदम यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

या कुटुंबाना मदतीचा हात म्हणून शिवसमर्थ मल्टिस्टेट को. ऑफ. क्रेडीट सोसायटी तळमावले व आरळा शाखेतर्फे ३५ हजार रुपयांच्या रोख रकमेची मदत करण्यात आली. यावेळी विकास शिरसट, भाऊसो दळवी, विजय पाटील, उत्तम राऊत, तुषार सुतार, अनिल पाटील आदि उपस्थित होते.

Popular posts
गुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .
इमेज
काळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र
इमेज
बनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,
इमेज
काळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..
इमेज