सौरभ करपे याची जलसंधारण विभागात उपविभागीय अधिकारी पदावर नियुक्ती.

 


तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

करपेवाडी ता पाटण येथील सौरभ वसंत करपे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी परीक्षेत 2019 मध्ये राज्यात 47 वा क्रमांक मिळवून उज्ज्वल यश संपादन केले. त्याची जलसंधारण विभागात जलसंधारण अधिकारी गट, अ (राजपत्रित )या पदावर नुकतीच नियुक्ती झाली.

त्यामुळे ढेबेवाडी विभागात सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.सौरभ याने प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत अहोरात्र परिश्रम करून उज्वल यश संपादन केले आहे. 

 सौरभचे वडील करपेवाडी ता पाटण येथील वसंत करपे हे अनेक वर्षा पासून तळमावले येथे टेलरिंगचा व्यवसाय करत असून तसेच ते एक निष्णात भजन गायक म्हणून परिसरात प्रसिद्ध आहेत तर त्यांची पत्नी अर्चना करपे सध्या करपेवाडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच म्हणून कार्यरत आहेत. या दांपत्याने अत्यंत खडतर परिस्थितीत आपल्या मुलास शिक्षण दिले. मुलांनेही आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी खूप परिश्रम घेतले. आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असलेनेच जलसंधारण अधिकारी होण्यापर्यंत मजल मारली.



सौरभ करपे यांचे प्राथमिक शिक्षण करपेवाडी येथील प्राथमिक शाळेत तर 5 वी ते 10 वी पर्यतचे माध्यमिक शिक्षण वाल्मिकी विद्यामंदिर तळमावले येथे झाले. नंतर सिव्हिल डिप्लोमा शासकीय तंत्रनिकेतन कराड व बी ई शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद येथे घेतले. व स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. व या परीक्षेत उज्ज्वल यशही संपादन केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी परीक्षेत 2019 मध्ये राज्यात 47 वा क्रमांक मिळवून जलसंधारण विभागात जलसंधारण अधिकारी गट, अ (राजपत्रित )या पदावर त्याची नियुक्ती झाली. 

या नियुक्तीने करपेवाडी ग्रामपंचायत, तळमावले, ढेबेवाडी, कुंभारगाव विभागातून सौरभ च्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. मुलाच्या या उज्वल यशाने सौरभच्या आई अर्चना करपे, वडील वसंत करपे यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत आहेत.