वाझोली शाळेचे माजी विद्यार्थी पांडुरंग लोहार यांची सामाजिक बांधिलकी.
तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
शाळेचे माजी विद्यार्थी हेच शाळेचे खरेखुरे ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर असतात, हे ओळखून वाझोली ता पाटण येथील जि प शाळेने एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. व शाळेचे माजी विद्यार्थ्यांना शाळेचे सदिच्छा दूत बनवून शाळेसाठी निधी संकलन करण्याची जबाबदारी माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून अनमोल व्यक्तिमत्त्व असणारे व अॅम्बॅसेडर माजी विद्यार्थी संघाचे जेष्ठ सल्लागार पांडुरंग दगडू लोहार (सेवानिवृत्त मॅनेजर दि सातारा सहकारी बँक लिमिटेड मुंबई)यांच्यावर सांघिक जबाबदारी या शाळेने सोपवली आहे.

        सरकारकडून शाळांना मिळणारे अनुदान दिवसेंदिवस कमी होत चालल्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांना अवांतर उपक्रम राबवण्यासाठी निधीची कमतरता भासते. यापुढे केवळ सरकारी अनुदानावर अवलंबून राहून शाळा चालवणे व टिकवणे हे केवळ अशक्य होणार असून संघाचे अध्यक्ष प्रवीण पाटील व सर्व टीम यांनी गावचे जेष्ठ असणारे सल्लागार श्री पांडुरंग लोहार (तात्या) यांच्यावर सल्लागार ही जबाबदारी देत पांडुरंग लोहार यांनी स्वतःच्या वैयक्तिक मदतीतून शाळेला एक उत्तम दर्जाचे स्टेज बांधत एक अनमोल देणगी पांडुरंग लोहार यांनी शाळेला दिली.

          तसेच गावच्या शाळेसाठी मुलांच्यासाठी त्यांनी शालेय उपयोगी सर्व वस्तू मदत करत त्यांनी गावातून प्रत्यक्षात शेवटच्या घटकापर्यंत पोचत लोकांच्यामधून हजारो रुपये मदत शाळेला मदत प्राप्त करून दिली .अशा या मौलिक कामगिरी मुळे पांडुरंग लोहार यांचे समाजातून तसेच अध्यक्ष प्रवीण पाटील, उपाध्यक्ष जयवंत मोरे,सचिव सुभाष मोरे ,शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप वीर उपशिक्षक सतीश कोकाटे मा सरपंच अशोक मोरे पोलीस पाटील विजय सुतार,आनंदा मोरे, जयवंत पाटील फौजी संदीप पाटील सुनील लोहार आदी मान्यवरांनी पांडुरंग लोहार यांचे अभिनंदन केले.