कलाप्रदर्शनातील निवडीबद्दल कुठरे च्या प्रणव पाटील चा सत्कार


तळमावले/वार्ताहर

पाटण तालुक्यातील कुठरे येथील प्रणव दिपक पाटील याच्या कोव्हिड 19 या वर आधारीत चित्राची निवड 61 व्या महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनात झाली आहे. प्रणव सध्या सातारा कला महाविद्यालय सातारा येथे मुलभूत अभ्यासक्रम या वर्गात शिक्षण घेत आहे. कला संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने प्रतिवर्षी कलाप्रदर्शन आयोजित केले जाते. या प्रदर्शनात कलाकृतीची निवड हा कलाकारांसाठी बहुमानच असतो.

या निवडीबद्दल प्रवण पाटील याचा महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण  मंत्री ना.श्री. उदय सामंत, रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री ना.श्री.अनिल परब व उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री ना.श्री.प्राजक्त तनपुरे यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला आहे. प्रणव हा न्यू इंग्लिश स्कूल कुठरेचा माजी विद्यार्थी आहे.

एनईएसके माजी विद्यार्थी संघ व समस्त कुठरे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी प्रणव पाटील याचे अभिनंदन केले आहे.

Popular posts
गुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .
इमेज
काळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र
इमेज
बनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,
इमेज
काळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..
इमेज