शिवसमर्थ महिला पतसंस्थेच्यावतीने रांगोळी स्पर्धेचे आयोजन

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

तळमावले येथील शिवसमर्थ महिला ग्रा.बि.शे.सहकारी पतसंस्था मर्या; तळमावले यांच्यावतीने नेहमीच विविध नावीण्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. मंगळवार दि.8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. महिला दिनाचे औचित्य साधून तळमावले येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन जीवन ज्योती हॉस्पिटल, कुंभारगाव-तळ मावले रोड, तळमावले, ता.पाटण, जि. सातारा या ठिकाणी केले आहे. सदर स्पर्धा लहान व मोठया गटात होणार आहे. विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत. तरी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 7030329004, 8080040835 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन शिवसमर्थ महिला पतसंस्था तळमावलेच्या वतीने करण्यात आले आहे.
Popular posts
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी
इमेज
साताऱ्यात राष्ट्रवादीला सुरुंग, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ शिवसेनेत दाखल.
इमेज
पाटण बाजार समितीच्या सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोंडांबे यांची निवड.
इमेज
मान्याचीवाडी गावाने पटकावला पन्नास लाख रुपयांचा माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार.
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायती तर्फे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.
इमेज