माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कराड येथे जंगी कुस्त्यांचे आयोजन.


 कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा: पश्चिम महाराष्ट्रात कुस्ती या खेळाबाबत विशेष प्रेम येथील जनतेत आहे. त्यामध्ये कराड मधील खाशाबा जाधव या कुस्ती पैलवनाने ओलंपिक स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. यामुळे कुस्ती अजरामर झाली. अश्या कुस्त्यांचे जंगी मैदान जिंकण्यासाठी कुस्तीगीर सज्ज आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कराड मधील बैल बाजार येथील मैदानावर 16 मार्च २०२२ रोजी दुपारी 3 वाजता कुस्त्यांचे आयोजन केले आहे, तरी आपल्या भागातील कुस्ती प्रेमींनी या स्पर्धेला उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक अधिकराव चव्हाण, इंद्रजीत चव्हाण, राहुल चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वरे केले आहे. 

या स्पर्धेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील मल्ल येणार असून त्यांची नोंदणी पद्धतीने कुस्ती नियोजीत केली आहे. या एकदिवसीय स्पर्धेत ५१ कुस्त्या होणार आहेत, तसेच १३ महिला कुस्ती पटूंनी सुद्धा या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. 

यानिमित्त अधिकराव चव्हाण म्हणाले कि, पश्चिम महाराष्ट्रात तथा राज्यात कुस्ती स्पर्धेला महत्व आहे. कुस्ती हा जुना खेळ आहे व तो लोप न व्हावा यासाठी कुस्तीला व कुस्ती खेळणाऱ्या पैलवानांना जपणे गरजेचं आहे. ऑलम्पिक स्पर्धेमध्ये सुद्धा कुस्ती या खेळाला मान्यता असून यामध्ये महाराष्ट्रातील व विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील अधिकाधिक खेळाडू पात्र व्हावे यासाठी कुस्त्या स्पर्धांचे ठिकठिकाणी आयोजन केले गेले पाहिजे.