संत रविदास महाराज यांच्या शिल्पाचे शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते लोकार्पण.


मुंबई |कृष्णाकाठ वृत्तसेवा: - धारावीतील संत रोहिदास मार्ग,सायन स्टेशन समोर,पोलीस बिट च्या बाजूला संत रविदास चर्मकार युवा महासंघ,धारावी विभाग यांच्या माध्यमातून मुंबई युवक अध्यक्ष व वर्षाताई गायकवाड यांचे कट्टर समर्थक राज साळुंके यांच्या विशेष प्रयत्नातून शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या निधीतून धारावीतील मुख्य रस्त्यावर संत रोहिदास महाराज यांच्या शिल्पाचे लोकार्पण राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री ना. वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय कदम,नगरसेवक हाजी बब्बू खान,सौ गंगा कुणाल माने,प्रदेशअध्यक्ष ज्ञानदेव कदम,महासचिव नरेंद्र वाडेकर,प्रवक्ता कैलास लोखंडे,प्रदेश युवक अध्यक्ष दीपक खोपकर,कार्याध्यक्ष रमेश शिंदे,महिला अध्यक्षा वनिता पटेकर, कार्याध्यक्षा सौ मनीषा ठवाळ,मुंबई युवक अध्यक्ष राज साळुंके,मुंबई अध्यक्ष मनीषा मानकर, प्रसिद्धिप्रमुख दिलीप ठवाळ यांच्यासह अनेक पदाधिकारी त्याचबरोबर धारावीतील चर्मकार समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती,समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.