कुंभारगाव चाळकेवाडी येथील साकव पूलाचे भूमिपूजन व कुंभारगाव वि.का.स सेवा सोसायटीचा नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार सोहळा संपन्न


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
ना.शंभूराज देसाई यांचे विशेष प्रयत्नातून चाळकेवाडी ता.पाटण येथील साकव पूलासाठी 3.55 लाख रूपये निधी मंजूर करण्यात आला होता . याचे भूमिपूजन मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. या वेळी कुंभारगाव येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा ही सत्कार करण्यात आला.

यानंतर स्पंदन एक्सप्रेस चे संपादक डॉ.संदीप डाकवे यांचे चर्चेतला चेहरा : चंद्रकांत चाळके या पुस्तकाचे मान्यवारांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. 

सदर कार्यक्रमासाठी बाळासाहेब देसाई सह साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिलीपराव चव्हाण, इंद्रजित चव्हाण, पाटण पंचायत समिती सदस्य सौ.सिमा मोरे, कुंभारगावचे उपसरपंच राजेंद्र चव्हाण,पाटण ता. शिवसेना उपप्रमुख सागर नलवडे, शिवदौलत बँकेचे संचालक मधुकर पाटील, युवानेते उदयसिंह चव्हाण, चाळकेवाडीचे उपसरपंच भरत चाळके, कुंभारगाव सोसायटीचे माजी चेअरमन भीमराव चव्हाण, दत्तात्रय चोरगे, परिसरातील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संदीप डाकवे यांनी केले तर प्रास्तविक भाषण डॉ दिलीपराव चव्हाण यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनाजी चाळके व मित्र परिवाराने विशेष परिश्रम घेतले.Popular posts
गुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .
इमेज
काळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र
इमेज
बनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,
इमेज
काळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..
इमेज