महाराष्ट्र राज्य बिल्डर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी उद्योजक आणि बिल्डर दत्तामामा मुळे यांची विक्रमी मताने निवड.
सोलापूर | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
बिल्डर्स असोसिएशन ही ब्रिटिश काळात स्थापन झालेली संघटना आहे. संघटनेचे सुमारे आठ हजार पाचशे सभासद असून 81 सेंटर आहे. या प्रत्येक सेंटरला मतदानाचा अधिकार आहे. एक मार्च रोजी अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर झाली. अध्यक्षपदासाठी दत्तामामा मुळे आणि महेश गुंडेचा उभे होते. प्रत्येक मतदाराला घरपोच बॅलेट पेपर पाठवण्यात आले. दहा ते ३० मार्च या कालावधीत मतदान घेण्यात आले. असोसिएशनच्या मुंबई येथील कार्यालयात मतमोजणी प्रक्रिया पार पडली. दत्तामामा मुळे यांना ५८ तर गुंडेचा यांना १९ मते मिळाली. निवडीनंतर मुळे यांचा सत्कार करण्यात आला. गुरुवारी सकाळी ते अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत . मुळे म्हणाले, राज्यातील बिल्डर्स, रस्ते कंत्राटदार यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि विकास कामांबाबत सरकारची समन्वय ठेवण्यासाठी ही संघटना कार्यरत आहे. शासनाच्या विविध समित्यांवर बिल्डर्स असोसिएशनच्या अधिकाऱ्यांचा समावेश असतो. या संघटनेचा अध्यक्ष झाल्याचा निश्चित अभिमान आहे. बिल्डर्स आणि रस्ते कंत्राटदार यांच्या हक्कांसाठी मी काम करेन.
Popular posts
गुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .
इमेज
काळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र
इमेज
बनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,
इमेज
काळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..
इमेज