विनोद भालेकर, बबन गोगावले, सुरेश मोरे यशवंतराव चव्हाण पुरस्काराने सन्मानित.


 पाटण  | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

कामोठे (नवीमुंबई) शिवसेना उपशहर प्रमुख विनोद भालेकर, विभाग प्रमुख बबन गोगावले, शाखा प्रमुख सुरेश मोरे यांना सामाजिक विभागातून यशवंतराव चव्हाण पुरस्काराने गौरविण्यात आले. 

साप्ताहिक यशवंत नीती व यशवंतराव चव्हाण फौंडेशन मुंबई यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्तींना सन 2021 चे "यशवंतराव चव्हाण पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले.रविवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता तळमावले ता. पाटण येथील वांगव्हॅली भवन येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. 

या सोहळ्यास सहकार, उद्योजक, शैक्षणिक, क्षेत्रातील दिग्गज चंद्रकांत चाळके, सुभाष बावडेकर ,प्रा.डॉ पतंगे (नागपूर ), प्रमोद देशमाने, रामदास शिंगारे, सचिन आचरे,प्रकाश बोत्रे,कविता कचरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुरेश पवार होते, यावेळी सामाजिक विभागातून विनोद भालेकर, बबन गोगावले , सुरेश मोरे , यांना सामाजिक कार्यात सक्रिय योगदान दिल्याबद्दल यशवंतराव चव्हाण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

कामोठे शहर शिवसेना शहर प्रमुख श्री. राकेश गोवारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक, राजकीय, सहकार क्षेत्रात कामोठे शहर, नवीमुंबई, येथे काम करत असताना कोविड काळात संपूर्ण सेक्टर मध्ये सॅनिटायझर करण्यात आले. हॉस्पिटल मध्ये गरीब पेशंटला फळे वाटप, गरजूंना अन्न धान्य वाटप केले आहे. पुरग्रस्तांना मदत, रक्तदान शिबीर , असे सामाजिक उपक्रम राबविले आहेत, तसेच रोड दुरूस्ती, स्ट्रीट लाइट दुरूस्ती,ड्रेनेज समस्या, त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न ,इंधन दरवाढ, प्राणी प्रश्न, प्राॅप्रटी टॅक्स अशा असंख्य प्रश्नांवर आवाज उठवून मोर्चे काढले, आंदोलने केली आहेत. या कामाची दखल घेऊन यशवंतराव चव्हाण फौंडेशनचे अध्यक्ष संजय सावंत यांनी सहकार विभागातून विनोद भालेकर, बबन गोगावले सामाजिक विभागातून सुरेश मोरे यांना यंदाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 

दरम्यान पुरस्कार मिळाल्यानंतर सर्वांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, कार्यक्रमास हितचिंतक, मित्र परिवार सह विविध क्षेत्रातील मान्यवर,मोठ्या संख्येने उपस्थित होते.

_________________________________

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला हे माझे भाग्यच आहे, माझ्या आईवडीलांचे संस्कार माझ्या साठी प्रेरणादायी आहेत, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला, यशवंतराव चव्हाण पुरस्काराने आणखीन बळ मिळाले आहे 

- सुरेश आनंदा मोरे (शिवसेना शाखाप्रमुख -कामोठे शहर)

_________________________________