पत्रकार संजय कांबळे यांना "यशवंतराव चव्हाण पुरस्कार"
पाटण  | कृष्णाकाठ वृत्तसेवा :  
पाटणच्या पत्रकारीता क्षेत्रात अल्पावधीतच ठसा उमटविणारे नावाजलेले युवा पत्रकार संजय कांबळे यांना मुंबई येथील यशवंतराव चव्हाण फौंडेशनचा यंदाचा "यशवंतराव चव्हाण पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले.

रविवार दिनांक 27 रोजी तळमावले ता.पाटण येथील वांगव्हॅली भवन येथे पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. 

यशवंतराव चव्हाण फौंडेशन मुंबई यांच्यावतीने गेले चार वर्षांपासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या मान्यवर व्यक्तींना राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण पुरस्काराने गौरविण्यात येते, या वषीॅच्या पुरस्कारासाठी पत्रकारिता विभागातून पाटण (बोंद्री) येथील पत्रकार संजय कांबळे यांची निवड करण्यात आली . 

संजय कांबळे हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारीतेसह सामाजिक कार्यात सक्रिय आहेत, पत्रकारीतेच्या माध्यमातून तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे,अभयारण्यग्रस्त जनतेचे पुनर्वसनाचे प्रश्न, आंदोलने, याबाबत विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून सततचे वार्तांकन केले आहे. त्याच बरोबर कोयना विभागातील जातपंचायतीच्या विळख्यात अडकलेल्या कुटुंबांना न्याय देण्यासाठी लेखनीच्या माध्यमातून आवाज उठविला , तसेच पाटण व परिसरातील बेकायदा खासगी सावकारीमुळे अनेक कुटुंबे त्रस्त होती त्यावर आवाज उठवला आहे . 

तसेच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न , अन्याय, अत्याचार, यावर आवाज उठविण्यासाठी संजय कांबळे यांची लेखणी सदैव तत्पर असते त्यांच्या या कामाची दखल घेऊन फौंडेशनचे अध्यक्ष संजय सावंत यांनी त्यांची पुरस्कारासाठी निवड केली . दरम्यान पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे. 

____________________________________
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला हे माझे भाग्यच आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आजवर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला, यशवंतराव चव्हाण पुरस्कारामुळे आणखीन बळ मिळाले आहे 
- संजय कांबळे ,पत्रकार
____________________________________