कुंभारगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे प्राथमिक व क्रियाशील सभासद फॉर्म नोंदणीस शुभारंभ


तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

कुंभारगाव येथे नूकताच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी - प्राथमिक व क्रियाशील सभासद फॉर्म नोंदणी शुभारंभ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री सारंग श्रीनिवास पाटील (बाबा) यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती श्री संजय देसाई याच बरोबर- माजी पाटण पंचायत समिती सदस्य, शंकरराव चव्हाण,नामदेव खटावकर- सदस्य, कुंभारगाव ग्रामपंचायत, सौरभ देसाई - चेअरमन नवभारत पतसंस्था,तळमावले, सुनील धर्माधिकारी उर्फ सुतार साहेब विश्वकर्मा प्रतिष्ठान, कुंभारगाव , अशोक देसाई , विजय गुरव - माजी सदस्य, कुंभारगाव ग्रामपंचायत, अरूण मोरे ( चिखलेवाडी - मोरेवाडी) , महेश मोरे (शेंडेवाडी ), सखाराम कळंत्रेे, माजी सदस्य कुंभारगाव ग्रामपंचायत, संजय भुलूगडे - माजी उपसरपंच तळमावले ग्रामपंचायत, किशोर भुलूगडेे,  विजय कचरे, चि.मयूर साळुंखे,   चि.रोहित देसाई , प्रथमेश देसाई उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन प्रा सचिन पुजारी सरांनी केले.