‘‘अरे वा, खूप छान बनवलंय, मनःपूर्वक आभार.....!’’

कॅमेरामन अभिनेते संजय जाधव यांच्याकडून कौतुकाची थापतळमावले | वार्ताहर : 

‘‘अरे वा, खूप छान बनवलंय, मनःपूर्वक आभार.....!’’ अशा शब्दात डाॅ.संदीप डाकवे यांनी रेखाटलेल्या अक्षरगणेशाचे कौतुक सुप्रसिध्द कॅमेरामन अभिनेते, दिग्दर्शक संजय जाधव यांनी कौतुक केले. ‘रावरंभा’ या चित्रपटातील एका गाण्याचे शुटींग कुसूर येथील वाडयात सुरु होते. यावेळी चित्रीकरणादरम्यांन डाॅ.डाकवे यांनी संजय जाधव यांची भेट घेतली आणि त्यांना त्यांच्या नावातील अक्षरगणेशा भेट दिला. यावेळी त्यांच्यासोबत कलादिग्दर्शक वासू पाटील, अभिनेते बाळकृष्ण शिंदे, अभिनेत्री मोनालिसा बागल, अभिनेत्री भाग्यश्री शिंदे, पत्रकार रुपाली जाधव, संजय पाटील, प्रभू गायकवाड, विजय मोहिते व इतर मान्यवर उपस्थित होते.

विविध क्षेत्रातील दिग्गजांना शब्दचित्रे, अक्षरगणेश, रेखाचित्रे भेट देणे या उपक्रमाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’, ‘हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड’ यामध्ये झाली आहे. विविध सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवत संदीप डाकवे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

संजय जाधव यांना अक्षरगणेश भेट दिल्यानंतर उपस्थित कलावंतांनी संदीप डाकवे यांच्या कलेचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. दरम्यान, संजय जाधव यांनी पहिल्यांदाच कराड परिसरामध्ये शुटींग केले आहे. त्यांनी इथल्या लोकेशन आणि निसर्ग परिसराचे कौतुक केले आहे.

राजकीय, सामाजिक, कला, सेलिब्रिटी अशा विविध क्षेत्रातील दिग्गज लोकांनी डाॅ.संदीप डाकवे यांच्या कलेचे नेहमी कौतुक केले आहे.