पाटण तालुका पोलिस पाटील संघटनेचे नूतन पदाधिकारी.
ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
पाटण तालुका पोलिस पाटील संघटनेच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. नवारस्ता येथे पार पडलेल्या कार्यक्रमास पाटण तालुक्यातील पोलीस पाटील उपस्थित होते.
पाटण तालुका पोलिस पाटील संघटनेच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. नवारस्ता येथे पार पडलेल्या कार्यक्रमास पाटण तालुक्यातील पोलीस पाटील उपस्थित होते.
यावेळी पाटण तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी राहूल विलासराव सत्रे, कार्याध्यक्षपदी नितीन जगन्नाथ पाटील, सचिव मच्छिंद्र रावसाहेब भिसे, संघटक रविंद्र ज्ञानदेव साळुंखे, उपाध्यक्षपदी हिम्मतराव रामचंद्र पावर (मल्हारपेठ विभाग) आनंदा सुरेश कुंभार (चाफळ विभाग) यशोदीप मानिकराव तांबे (तारळे विभाग) संभाजी शिवाजी चाळके (कोयना विभाग), प्रसिद्धी प्रमुख अमित बबन शिंदे तर सदस्य पदी संग्राम अच्युतराव पांढरपठ्ठे, नितीन किसन पाटील, उमेश यशवंत पवार, शेखऱ अमृतराव देशमुख, राजाराम इंगळे, कल्पेश चव्हाण, वैभव बाळासाहेब मोरे, अधिक दिनकर पवार, संजय लक्ष्मण कदम, जगन्नाथ आनंदा माने यांची निवड झाली. निवड झालेल्या संघटनेच्या पदाधीकार्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.