गणेश आस्कट याचे दुःखद निधन

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:

पाटण तालुक्यातील मस्करवाडी- काळगाव येथील युवक गणेश पांडुरंग आस्कट याचे वयाच्या 22 व्या वर्षी हृदयविकाऱ्याच्या तीव्र धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्याच्या पश्चात त्याची आई आणि लहान बहीण आहे. 2 वर्षांपूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्याच्या अकाली निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या निधनाबद्दल श्री बाल गणेश मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ मस्करवाडी यांनी शोक व्यक्त केला आहे.