तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
सिक्कीमचे माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील यांच्या सोबतच्या डाॅ.संदीप डाकवे यांनी तयार केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन 12 मार्च, 2022 रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या 109 व्या जयंतीदिनी वेणूताई चव्हाण सभागृह, कराड येथे झाले.
स्पंदन प्रकाशनाची सातवी निर्मिती असलेल्या ‘गाठीभेटी’ या पुस्तकाचे प्रकाशन सिक्कीमचे माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील, जेष्ठ पत्रकार मधुकर भावे, विकास भोसले, शशिकांत पाटील व अन्य मान्यवर यांच्या हस्ते झाले. श्रीनिवास पाटील यांची प्रथम भेट झाल्यापासून आतापर्यंतच्या विविध उपक्रमांचे फोटो यात आहेत. खासदार पाटील यांनी प्रकाशनानंतर या पुस्तकाची बारकाईने पाहणी केली. त्यांनी डाॅ.डाकवे यांच्या फोटो संग्रहाचे व फोटोबद्दलच्या अचूक माहितीचे, कलात्मक वृत्तीचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.
डाॅ.संदीप डाकवे यांचे हे सहावे पुस्तक आहे. तसेच मुक्काम पोस्ट डाकेवाडी, सेलिब्रिटी कट्टा, ग्रेट स्केच भेट, ऋणानुबंध, आठवणीतील भाऊ, अक्षर शुभेच्छा ही त्यांची आगामी पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.
प्रथम ‘मनातलं’ या चारोळीसंग्रहाचे प्रकाशन स्वतःच्या वाढदिनी, व्दितीय ‘जलयुक्त शिवार अभियान’ लेख संग्रह पुस्तकाचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस, तृतीय ‘दीप उजळतो आहे’ या पुस्तकाचे प्रकाशन गणेश चतुर्थीदिनी आईवडीलांच्या हस्ते, चतुर्थ ‘समाज स्पंदनाची पत्रे’ या पुस्तकाचे प्रकाशन जागतिक टपालदिनी डाकघरात पोस्टमन काकांच्या हस्ते तर पाचव्या ‘स्नेहबंध’ या पुस्तकाचे प्रकाशन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले आहे.
________________________________