यशवंत विचारांचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार समाजातील लोकांना प्रेरणादायी ठरेल - चंद्रकांत चाळके
यशवंतराव चव्हाण फौंडेशन मुंबई यांच्यावतीने यशवंतराव चव्हाण पुरस्कारांचे वितरण.
तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

 साप्ताहिक यशवंतनीती व यशवंतराव चव्हाण फौंडेशन मुंबई यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्तींना सन 2021 चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 रविवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता तळमावले ता. पाटण येथील वांगव्हॅली भवन येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. 

या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्तींचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सहकार व उद्योग क्षेत्रातील मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या वेळी चंद्रकांत चाळके उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले यशवंत विचारांचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार समाजातील लोकांना प्रेरणादायी ठरेल. यातून समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेवकांना नवी ऊर्जा प्राप्त होईल व समाजासाठी अधिक जोमाने काम करता येईल.   साप्ताहिक यशवंतनीती व यशवंतराव चव्हाण फौंडेशन मुंबई यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्तींना दरवर्षी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते हा खूप मोठा स्तुत्य उपक्रम आहे त्यांच्या उपक्रमास शुभेच्छा व पुरस्कार प्राप्त विविध क्षेत्रातील सर्व समाजसेवकांचे अभिनंदन.      

 या सोहळ्यास सहकार, उद्योजक क्षेत्रातील दिग्गज चंद्रकांत चाळके, सुभाष बावडेकर,प्रा.डॉ पतंगे (नागपूर), प्रमोद देशमाने, रामदास शिंगारे, सचिन आचरे,प्रकाश बोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुरेश पवार होते.

 यावेळी पत्रकारीता विभागातून पाटणचे पत्रकार संजय कांबळे, सहकार विभागातून अनिल शिंदे, बाळकृष्ण काजारी,  विनोद भालेकर, एम. बी. आचरे, लक्ष्मण घराळ.

 सामाजिक विभागात राहूल शेडगे, दत्ता तोडकर, अधिक कर्पे, सुरेश माने, दत्ता चोरगे, विलास गोडांबे, दीपक कदम, बाबुराव पाटील, मच्छिंद्र गायकवाड, आशिष कोरडे, नम्रता कुलकर्णी, जितेंद्र भालेकर, दिनेश डाकवे, राधिका पन्हाळे, विक्रम वरेकर,रेश्मा डाकवे. 

 उद्योजक विभागात वसंतराव बोत्रे, वनिता मोरे, कृष्णा पाचपुते, कला विभागात- प्रशांत कुंभार,क्रिडा विभागात-यश पाटील, सरपंच विभागा मधून स्वाती बावडेकर, संदीप टोळे, अशा सामाजिक,सहकार,उद्योजक,कलाक्रिडा,पत्रकारीता, प्रशासकीय आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

   प्रारंभी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. 

   यावेळी बोलताना फौंडेशनचे अध्यक्ष संजय सावंत म्हणाले गत चार वर्षांपासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्तीना यशवंतराव चव्हाण पुरस्काराने गौरविण्यात आले . तळागळात काम करणार्‍या लोकांचा गुणगौरव करून त्यांच्या पाठीवर थाप टाकून त्यांना पुरस्कार रूपाने प्रोत्साहन देणे हा यशवंतराव चव्हाण फौंडेशनचा मुख्य उद्देश आहे. 

   स्व. यशवंतराव चव्हाण हे सातारा जिल्ह्याचे सुपूत्र आहेत, त्यांना आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. त्यांच्या महान कार्याचा गौरव म्हणून यशवंतराव चव्हाण फौंडेशनची स्थापना करून चार वर्षांपासून विविध क्षेत्रातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचा गौरव करत आहोत. मुंबई येथे यापूर्वी तीन पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आले होते. त्यास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यस्तरीय पुरस्कार देऊन लोकांच्या कामाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. 

या वेळी सुभाष बावडेकर, चंद्रकांत चाळके, सचिन आचरे, सुरेश पवार व इतर मान्यवरांनी सर्व पुरस्कार प्राप्त पुरस्कारथीॅंना शुभेच्छा दिल्या. यशवंतराव चव्हाण फौंडेशनचे अध्यक्ष संजय सावंत यांनी सर्वांचे स्वागत केले. 

   सूत्रसंचालन करताना कविता कचरे यांनी सर्व पुरस्कार प्राप्त  मान्यवरांच्या समाजातील कार्याचा आढावा घेतला व त्यांच्या कार्यकर्तृत्वा बद्दल उपस्थितांना माहिती दिली.

      कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, पुरस्काराथीॅ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे समाजसेविका कविता कचरे यांनी आभार मानले.