चाईल्ड उन्नती फाऊंडेशन मुंबई यांच्यातफे शालेय वस्तूचे वाटप


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या चाईल्ड उन्नती फाऊंडेशन मुंबई च्या वतीने आजपर्यंत अनेक ठिकाणी मदत करण्यात आली आहे.कॅन्सरग्रस्त मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत,पूरग्रस्तांना मदत,शालेय विद्यार्थी यांना सतत शालेय वस्तूचे वाटप,गरीब गरजू विद्यार्थ्यांची शालेय फी भरणे असे सामाजिक,शैक्षणिक कार्य सुरूच असते. नुकतेच त्यांनी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील तोंडले, घोडेवाडी, निंबाळकर वस्ती, जाधववाडी, खुडूकदरा बळीपवस्ती, डांगेवाडी या सात गावातील जिल्हा परिषद शाळा मध्ये पहिली ते चौथी मधील गरजू मुला- मुलींना प्रत्येकी एक डझन वह्या वाटप करण्यात आल्या. यावेळी संस्थेचे प्रमुख दिलीप दडस, जालिंदर दडस, रामदास दडस, दादा दडस आणि इतर मान्यवर उपस्थित होते.