कोटा जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स च्या वतीने पोलिस काका, पोलिस दीदी उपक्रम.

 

कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
कराड शहर पोलीस स्टेशन व कोटा जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स च्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र पोलिसांच्या भरोसा सेल च्यावतीने पोलीस काका व पोलीस दीदी हा प्रोग्रॅम राबवण्यात आला . या कार्यक्रमात कराड शहर पोलीस स्टेशन च्या वतीने श्रीमती हसीना मुजावर यांनी कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना सायबर क्राईम , सोशल मेडिया बुलिंग , मोबाईल च्या सोशल मेडिया चे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन केले. समाजात असलेल्या अपप्रवृत्ती पासून कसे दूर राहावे याबाबत सांगितले. आपले जवळचे मित्र मैत्रिणी किंवा नातेवाईक सुद्धा कशी आपली फसवणूक करू शकतात व आपण कसे त्यावर सावध राहून वाचू शकतो हे सांगितले . कराड शहरात निर्भया व्हॅन असून विद्यार्थांनी काही अडचण असल्यास 112 या नंबर वर संपर्क साधून पोलिसांची मदत घ्यावी असे आवाहन केलेे . 
यावेळी कोटा ज्युनिअर कॉलेजच्या संचालिका सौ.मंजिरी खुस्पे यांनी श्रीमती हसीना मुजावर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कोटा ज्युनिअर कॉलेज चे संस्थापक डॉ.महेश खुस्पे यावेळेस उपस्थित होते . संचालक डॉ. महेश खुस्पे सरांनी सांगितले कि विद्यार्थ्यांसाठी श्रीमती हसीना मुजावर यांनी दिलेले व्याख्यान खूप छान झाले असून विद्यार्थ्यांना नक्कीच याचा फायदा होऊन सर्व विद्यार्थी यापुढे जरूर ती खबरदारी घेतील असे सांगितले . कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स च्या प्राचार्या श्रीमती जयश्री पवार यांनी आभार मानले .

Popular posts
गुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .
इमेज
काळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र
इमेज
बनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनसहकार पतसंस्थेच्या वतीने जिजाऊ वस्तीगृहातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
इमेज