धगधगती मुंबईच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर.

सहकार- जनार्दन बोत्रे, पत्रकारिता- दीपक भातुसे, कलारत्न- अश्विनीताई महागडे,(सिनेअभिनेत्री), युवा नेता गौरव रोहितदादा पाटील यांच्यासह विविध रत्नाचा होणार सन्मान.

मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 

प्रतिनिधी - धगधगती मुंबई या वृत्तपत्रास १२ वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने वृत्तपत्राच्या वर्धापन दिनासह सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.  

       यावेळी शैक्षणिक, सामाजिक, सहकार, कला, वैद्यकीय, पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या कर्तृत्ववान आणि समाजपयोगी कार्य करणाऱ्या मंडळींना "धगधगती मुंबई" च्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या सन्मान सोहळ्यात "रत्न"पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

 सहकार क्षेत्रातील दि शिवसमर्थ मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड चे संस्थापक/अध्यक्ष ऍड. जनार्दन बोत्रे यांना सहकार रत्न, पत्रकारिता क्षेत्रातील झी २४ तासचे दीपक भातुसे यांना पत्रकारिता गौरव पुरस्कार, सिने क्षेत्रातील 'आई कुठे काय करते' मधील अश्विनी महांगडे यांना कलारत्न, राजकीय क्षेत्रातील सुरुवातीलाच दमदार एन्ट्री करणारे स्वर्गीय आर. आर. पाटील (आबा) यांचे सुपुत्र रोहितदादा पाटील यांना युवा नेता गौरव, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल समाजसेवक योगेश पाटणकर यांना समाजरत्न, तर दिलीप दडस यांना समाजभूषण पुरस्कार याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल सातारचे दीपक भुजबळ यांना शिक्षण रत्न, विधी व कायदा क्षेत्रातील ऍड आनंद सांगवीकर यांना विधी कायदेभूषण, तर वैधकीय क्षेत्रातील कार्याबद्दल डॉ सुहास देसाई यांना वैद्यक रत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

      सदर पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात येणार असून शनिवार दि २६ फेब्रुवारी २०२२ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता.

मॉर्निंग स्टार इंग्लिश स्कूल, संत रोहिदास मार्ग, (सायन बांद्रा लिंक रोड) साहिल हॉटेल समोर,

धारावी, मुंबई ४०००१७ येथे होणार आहे. या अगोदर दुपारी ४ ते ६.०० वाजेपर्यंत राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.