श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी ( डी फार्म) येथे कार्यशाळेचे आयोजन


डॉ. चिवटे यांचे स्वागत करताना प्राचार्या वैशाली महाडिक.
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी ( डी फार्म) घोगाव या महाविद्यालयामध्ये एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचा विषय व्यक्तिमत्व विकास व त्याचे फार्मसी प्रोफेशनल मधील फायदे हा होता सदर कार्यक्रमासाठी कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसी येथील प्राध्यापक डॉ. निरंजन चिवटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणातून विद्यार्थ्यांना फार्मसी प्रोफेशनमध्ये शिकत आहात तर तुमची पर्सनॅलिटी कशी असली पाहिजे तुमची वेशभूषा तसेच वर्तणूक व वेळेचे नियोजन तसेच स्वतःच्या विकासासाठी तुमचे कोणत्या गोष्टीचे ज्ञान अवगत केले पाहिजे व स्वतःचा सर्वांगीण विकास कसा केला पाहिजे हे सांगितले यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन, नरेंद्र मोदी, लता मंगेशकर, धीरूभाई अंबानी, सचिन तेंडुलकर इत्यादींची उदाहरणे दिली.

या कार्यक्रमावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या वैशाली महाडीक यांनी डॉ. चिवटे यांचे बुके देऊन स्वागत केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक दीप्ती पाटील यांनी केले.