पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा : पाटण येथील अल्पवयीन दिव्यांग मुलीला बाहेर फिरायला आणि खायला देण्याच्या बहाण्याने बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पाटण पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, 9 आरोपींना 12 तासांत अटक करण्यात आली. दरम्यान, या घटनेने पाटण तालुका हादरला आहे.
याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिली आहे. एका महिलेने अल्पवयीन दिव्यांग मुलीचा गैरफायदा घेऊन तिला बाहेर फिरायला नेण्यास भाग पाडले. बाहेर खाऊ देण्याची व पैसे देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तिला बाहेर घेऊन गेली. मुलीला पाटण व आजूबाजूच्या परिसरातील लोकांची ओळख करून देऊन त्यांच्याशी शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. पाटण व आजूबाजूच्या परिसरातील आठ जणांनी या पीडितेवर वेळोवेळी व वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन वारंवार बलात्कार केला.
याबाबत पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील सर्व नऊ आरोपींची नावे निष्पन्न करून त्यांचा शोध घेऊन त्यांना बारा तासांत अटक करण्यात आली.