कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : यूजीसी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या 26 सप्टेंबर, 2021 च्या सेट परीक्षेत शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे कार्यरत असलेले प्रा.सुरेश यादव यांनी इंग्रजी विषयात उज्ज्वल यश संपादन केले. या यशात प्राचार्य प्रो.डॉ. सतीश घाटगे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. प्रा.यादव यांची सध्या माजी प्राचार्य डॉ.सुभाष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी सुरू आहे.
या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, सचिव शुभांगीताई गावडे, प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ (सहसचिव प्रशासन), प्राचार्य डॉ. एस. एम. गवळी (सहसचिव अर्थ), शिवाजी विद्यापीठ माजी इंग्रजी अधीविभाग प्रमुख डॉ. अक्षय सरवदे, प्राचार्य एस. के. कुंभार (माजी सहसचिव अर्थ), प्राचार्य आर. के.भोसले (माजी सहसचिव प्रशासन), प्राचार्य डॉ. अशोक करांडे (माजी सहसचिव प्रशासन), प्राचार्य डॉ. जे. एस. पाटील, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, प्राचार्य डॉ जे. ऐ. म्हेत्रे, तसेच या महाविद्यालयातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ गुरुदेव कार्यकर्ते, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.