गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे नेतृत्वाखाली मरळी सोसायटी निवडणुक बिनविरोध.

नवनिर्वाचित संचालक मंडळाचा युवा नेते यशराज देसाई यांनी केला सत्कार.



दौलतनगर | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
मरळी,ता.पाटण येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतिच बिनविरोध पार पडली.गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली नूतन संचालक मंडळामध्ये चंद्रकांत तानाजीराव देसाई,प्रविण लक्ष्मण पाटील,शंकर गणपत कदम,रामचंद्र खाशाबा कदम, भगवान परशूराम माने,संजय आण्णा कदम,सतिश किसनराव पाटील,श्रीपती पांडूरंग सुतार,शकुंतला बाळकृष्ण पवार,विमल तुकाराम गव्हाणे,ज्ञानदेव पांडूरंग गोसावी,शामराव विठ्ठल कांबळे,तुकाराम साधू पाटसुते हे नवनिर्वाचित संचालक बिनविरोध झाले.बिनविरोध झालेल्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार युवा नेते मा.यशराज देसाई याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मरळी विकास सेवा सोसायटीचे पंचवार्षिक निवडणूकीमध्ये बिनविरोध संचालकांचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,युवा नेते मा.यशराज देसाई,शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,व्हा.चेअरमन राजाराम पाटील,शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲङमिंलिंद पाटील,जिल्हा परिषद सदस्‍य विजय पवार,सुग्रा बशीर खोंदू,पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई,सुरेश पानस्कर,संतोष गिरी,सीमा मोरे,निर्मला देसाई,सुभद्रा शिरवाडकर,शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे यांनी अभिनंदन केले. मरळी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य जालंदर पाटील,पंचायत समिती सदस्य संतोष‍ गिरी,सरपंच राजेंद्र माळी,उपसरपंच विनोद कदम, भरत साळूंखे,गजानन पाटील,दिलीप कदम,साईनाथ सुतार,संजय सणस, सरपंच दिपक गव्हाणे,प्रशांत देसाई,विलास कदम,लक्ष्मण पवार, एकनाथ साळूंखे,सुनील साळूंखे,चंद्रकांत कदम,अशेाक कदम, ए.डी.पाटील,किरण सुतार,बाबूराव पाटील,सुखदेव गुरव,ज्ञानदेव चोपडे,सतिश कदम,शशिकांत चन्नने,दत्तात्रय पाटील,बळवंत कदम,आनंदराव देसाई,अनिल देसाई,अमोल मोहिते,राजेंद्र भालेकर,अर्जुन सत्रे,मच्छिंद्र साळूंखे,सुरेखा पाटील,मोहन गव्हाणे, संतोष देसाई,संजय पवार,संतोष पाटसुते आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.