घोगाव : श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे नॅशनल वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनार मध्ये भारतातील महिलांची प्राचीन आणि आधुनिक स्थिती या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराडच्या प्राध्यापीका डॉ. सुषमा किर्तने या कार्यक्रमासाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
त्यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणातून विद्यार्थिनींना आपण आधुनिक काळातील स्त्रीप्रमाणे कसे प्रत्येक क्षेत्रात आपण आपले नाव मिळवले पाहिजे व आपले उच्च स्थान सर्व संकटावर मात करुन गाठले पाहिजे हे सांगितले व विवध विषयांवर मार्गदर्शन केले.
या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या वैशाली महाडिक यांनी सुषमा कीर्तने यांना ई बुके देऊन स्वागत केले व ई सर्टिफिकेट दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक केतकी शिंदे यांनी केले.
त्याच प्रमाणे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, इस्लामपूरचे प्राध्यापक डॉ. संतोष खडसे यांचेही व्याख्यान घेण्यात आले डॉक्टर संतोष खडसे हे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज इस्लामपूर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या व्याख्यानाचा विषय लोकशाहीतील मतदारांची भूमिका हा होता. त्यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणातून लोकशाही म्हणजे काय हे विद्यार्थ्यांना सांगितले लोकशाहीमध्ये मतदार म्हणून आपण भारत देशाची राज्यघटना समजावून घेतली पाहिजे त्याचे महत्त्व काय व मतदाराला काय अधिकार आहेत याबद्दल माहिती दिली. या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या वैशाली महाडिक यांनी त्यांचेही ई बुके देऊन स्वागत केले व ई सर्टिफिकेट दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक प्रियांका आलेकरी यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा डॉ.उषा जोहरी, सचिव श्री प्रसून जोहरी व प्राचार्या वैशाली महाडिक यांनी शुभेच्छा दिल्या.