जन विकासचे संस्थापक बाळकृष्ण काजारी यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
तळमावले ता.पाटण येथील जनविकास सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन बाळकृष्ण काजारी यांना यशवंतराव चव्हाण फाउंडेशन यांच्या मार्फत यंदाचा यशवंतराव चव्हाण हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

साप्ताहिक यशवंत नीती व यशवंतराव चव्हाण फौंडेशन मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारे सन २०२१ चे यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर झाले असून आज रविवार दि. २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता तळमावले ता. पाटण येथील वांगव्हॅली भवन येथे विविध क्षेत्रातील

मान्यवरांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती यशवंतराव चव्हाण फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय सावंत यांनी दिली आहे.

यशवंतराव चव्हाण फौंडेशन मुंबई यांच्यावतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या मान्यवर व्यक्तीना यशवंतराव चव्हाण पुरस्काराने गौरविण्यात येते. जनविकास सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन बाळकृष्ण काजारी हे विभागात विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. तसेच गावच्या विकासासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. आदर्श सरपंच म्हणून ही त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

सामाजिक व सहकार क्षेत्रातील कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. जनविकास सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन बाळकृष्ण काजारी यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.