यशवंतराव चव्हाण पुरस्कार २०२१ जाहीर

साप्ताहिक यशवंत नीती व मुंबईतील यशवंतराव चव्हाण फौंडेशनच्या वतीने उद्या तळमावले येथे वितरण



तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

साप्ताहिक यशवंत नीती व यशवंतराव चव्हाण फौंडेशन मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारे सन 2021 चे यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर झाले असून रविवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता तळमावले ता. पाटण येथील वांगव्हॅली भवन येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती यशवंतराव चव्हाण फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय सावंत यांनी दिली आहे. 

यशवंतराव चव्हाण फौंडेशन मुंबई यांच्यावतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या मान्यवर व्यक्तीना यशवंतराव चव्हाण पुरस्काराने गौरविण्यात येते, या वषीॅचे पुरस्कार जाहीर झाले असून *सहकार विभागातून अनिल शिंदे, बाळकृष्ण काजारी, बबन गोगावले, विनोद भालेकर, एम. बी. आचरे, लक्ष्मण घराळ, सामाजिक विभागात राहूल शेडगे, दत्ता तोडकर, अधिक कर्पे, सुरेश माने, दत्ता चोरगे, विलास गोडांबे, दीपक कदम, बाबुराव पाटील, मच्छिंद्र गायकवाड, आशिष कोरडे, नम्रता कुलकर्णी, जितेंद्र भालेकर, दिनेश डाकवे, राधिका पन्हाळे, विक्रम नरेकर, रेश्मा डाकवे, जनसेवा तरूण मंडळ, मोरेवाडी. 

उद्योजक विभागात वसंतराव बोत्रे, वनिता मोरे, कृष्णा पाचपुते, 

प्रशासकीय विभागमधून - संतोष पवार पोलिस उपनिरीक्षक ढेबेवाडी पोलिस स्टेशन, कला विभागात- प्रशांत कुंभार, क्रिडा विभागात -यश पाटील, पत्रकारीता विभागात संजय कांबळे 

सरपंच विभागा मधून स्वाती बावडेकर, संदीप टोळे, सारिका पाटणकर, अशा सामाजिक, सहकार, उद्योजक ,कला, क्रिडा,पत्रकारीता ,प्रशासकीय आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

मानाचा फेटा,शाल ,श्रीफळ, सन्मानचिन्ह, गौरवपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरण समारंभ चंद्रकांत चाळके, सुभाष बावडेकर, कविता कचरे आशिष आचरेकर, सचिन आचरे, अमित टोळे, संजय आंब्रुळकर, प्रकाश बोत्रे ,सचिन पवार, आदी विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या शुभ हस्ते पुरस्कार वितरण संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन फौंडेशनचे अध्यक्ष संजय सावंत यांनी केले आहे.