सौ.रेश्मा डाकवे यांचा यशवंतराव चव्हाण पुरस्काराने होणार गौरव


तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

‘वसा सामाजिक बांधिलकीचा’ हे ब्रीद वाक्य घेवून कार्यरत असलेल्या स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले आहे. याची दखल घेत या ट्रस्टच्या सचिव सौ.रेश्मा संदीप डाकवे यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2022 जाहीर झाला आहे.

पाटण तालुक्यातल डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट गेली 5 वर्षापासून कार्यरत आहे. 4 मे, 2017 रोजी धर्मादाय आयुक्त कार्यालय सातारा या ठिकाणी ट्रस्टने अधिकृत नोंदणी केली आहे. सामाजिक क्षेत्रातील नामांकनामधून सौ.रेश्मा डाकवे यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. रविवार दि.27 फेब्रुवारी, 2022 रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती यशवंतराव चव्हाण फौंडेशन मुंबईचे अध्यक्ष संजय सावंत यांनी दिली आहे.

अनेक उपक्रम राबवून स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने आपल्या कामाची कर्तृत्वमुद्रा समाजमनावर उमटवली आहे. ट्रस्टच्या या कामाची दखल घेत ट्रस्टच्या सचिव सौ.रेश्मा डाकवे यांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

या पुरस्काराबद्दल सौ.डाकवे यांचे शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे, प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे, प्रा.ए.बी.कणसे, राजाराम डाकवे, गयाबाई डाकवे, कलाशिक्षक बाळासाहेब कचरे, जयंत कदम, एन.बी.परीट, सुरेश जाधव, स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट, शिवछत्रपती प्रतिष्ठान डाकेवाडी यांचे पदाधिकारी यांनी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

__________________________________________

पुरस्काराने प्रेरणा मिळाली :

या पुरस्काराने आपणास प्रेरणा मिळाली आहे. तसेच आतापर्यंत समाजाप्रती केेलेल्या कार्याचा गौरव झाला आहे. समाजात यापुढे कार्य करताना आणखी जबाबदारीने करावे लागेल. ट्रस्टला विविध उपक्रमांसाठी मदत करणाऱ्यांचे यानिमित्ताने मनःपूर्वक आभार. या पुरस्कारामुळे स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या कर्तृत्वावर अभिमानाची मोहोर उमटली आहे. अशी भावना ट्रस्टच्या सचिव सौ.रेश्मा डाकवे यांनी व्यक्त केली आहे.

__________________________________________