नडशी सोसायटीवर निवास थोरात यांचे वर्चस्व अबाधित, माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :  कराड तालुक्यातील नडशी गावच्या वि. का. स. सेवा सोसायटी निवडणुकीत जि प सदस्य निवासराव थोरात यांनी त्यांचे नेतृत्व सिद्ध करीत गावच्या प्रमुख आर्थिक संस्थेला ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. निवास थोरात यांच्या सिद्धेश्वर विकास पॅनेल ने माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली 13 जागापैकी 11 जागा जिंकून सोसायटीवर आपले वर्चस्व अबाधित राखले आहे. यावेळी सिद्धेश्वर विकास पॅनेल चे प्रमुख जि प सदस्य निवास थोरात यांच्यासह सर्व सदस्यांचा माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सर्व उमेदवारांनी आज माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी आण्णा सखाराम थोरात, निवृत्ती अंतू घोलप, आनंदराव थोरात, शंकर थोरात, भीमराव थोरात, विठ्ठल रविढोणे, हिंदुराव थोरात, आनंदराव संभाजी थोरात, आनंदराव बाबुराव थोरात, लक्ष्मण दादू थोरात, उत्तम ज्ञानू कदम, युवराज थोरात, भीमराव शंकर थोरात, संपत जगन्नाथ थोरात, शशिकांत निवृत्ती थोरात, शंकर दिनकर थोरात, आप्पासो किसन थोरात, भीमराव हिंदुराव थोरात, अशोक रामचंद्र कदम, गणेश दिनकर थोरात, अनिल कृष्णत थोरात, अधिकराव थोरात, अनिल थोरात, सुहास रामचंद्र थोरात आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी विजयी उमेदवारांना मार्गदर्शन करताना माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, नडशी गावाने युवक व अनुभवी या सर्वाना सोबत घेऊन निवास थोरात यांच्या नेतृत्वात पॅनेल उभा केले व ते निवडूनही आणले, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. गावची सहकारी सोसायटी हा गावाचा आर्थिक कणा असतो त्याची जबाबदारी योग्य व निपक्षपाती लोकांकडे असेल तर सर्व कारभार सुद्धा पारदर्शी राहतो. म्हणूनच नडशी सोसायटी च्या सर्व विजयी उमेदवारांनी अत्यंत पारदर्शकपणे सोसायटी चालवावी व त्याचे काम आदर्शवत करावे अश्या शुभेच्छा देऊन सर्व विजयी उमेदवारांना शुभेच्छा देतो.

याप्रसंगी जि प सदस्य निवास थोरात म्हणाले कि,* माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण व उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटी चे पॅनेल उभा केले व मतदारांपुढे आमचा कारभार कसा असणार याचा लेखाजोखा मांडला. गावातील अनुभवी नेत्यांचे, ग्रामस्थांचे मार्गदर्शन ही वेळोवेळी घेतले. सर्व सभासदांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता स्वच्छ व पारदर्शी कारभार करणाऱ्या सिद्धेश्वर विकास पॅनेल ला साथ देत बहुमत दिले. हा सर्वांचा विश्वास नक्कीच आम्ही पारदर्शी कारभाराने सार्थ ठरवू.