गोरेगावातील नियोजित नाट्यगृहास गुरु रविदास महाराजांचे नाव देणार महापौर किशोरी पेडणेकरांचे चर्मकार संघाला आश्वासनमुंबई|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

 चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच चर्मकार विकास संघाच्या सल्लागार तथा मुंबई पालिका नगसेविका आशाताई मराठे व मुंबई प्रदेश अध्यक्ष सुभाष मराठे व पदाधिकाऱ्यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेऊन संत शिरोमणी रविदास महाराज यांचे नाव गोरेगाव (प ) येथील टोपीवाला भाजी मंङई येथील नियोजित नाट्यगृहास नाव द्यावे अशा मागणीचे निवेदन नुकतेच दिले. यावेळी प्रशासकीय स्तरावर लवकरात लवकर प्रस्ताव सादर करुन संत शिरोमणी रविदास महाराज यांचे नाव नाट्यगृहास देण्यासाठी मंजुरी देण्यात येईल असे अश्वासन महापौरांनी यांनी चर्मकार विकास संघाच्या समितीस दिले. 

यावेळी राजनंदन महादेव चव्हाण मुंबई प्रदेश सचिव, अशोक कांबळे अध्यक्ष गटई आघाडी,गणेश खाडेअध्यक्ष, नवीमुंबई,मिनाक्षीताई सोनवणे महिला अध्यक्षा पश्चिम मुंबई,अनिल मुरुडकर दक्षिण मुंबई अध्यक्ष, राजेश मेढेकर दक्षिण मुंबई उपाध्यक्ष,राजू नागावांकर वरळी विधानसभा अध्यक्ष, अनिल म्हाप्रोलकर वरळी विधानसभा उपाध्यक्ष,

श्रीकांत गणेश तळकर शिवडी तालुका सचिव चर्मकार समाज मुंबई पदाधिकारी उपस्थितीत होते.दरम्यान,पालिकेच्यावतिने संत शिरोमणी रविदास महाराज जयंती साजरी करताना नियोजन समितीत सर्व समावेशक नियोजन समिती स्थापन करावी व सर्व नोंदणीकृत संघटनांचा सहभाग समितीत करावा अशी मागणीही चर्मकार विकास संघाकडून केली असून यावर महापौरांनी ११ फेब्रुवारी रोजी विशेष बैठकीचे आयोजन केले आहे.तसेच यावेळी जयंती निधीत वाढ केली जाणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिली.